डिजिटल युगातील रिकामे व भरलेले खिसे!

*प्रथम माननिय पुल यांची माफी मागून हा लेख लिहितोय*

डिजिटल युगातील रिकामे भरलेले खिसे!
... सुनिल पुणे TM 8007939422

भरलेला खिसा माणसाला "जग" दाखवतो…
आणि रिकामा खिसा जगातील "माणसं" दाखवतो, हे तर सगळ्यांनी अनुभवलंय...(पुल)

पण आता डिजिटल युग आलंय… इथे खिसा रिकामा असला तरी "फोन" मध्ये GPay, PhonePe, Paytm, UPI QR असला की आपण राजा!
कोणी चहा विक्रेता असो किंवा मॉलमध्ये बिलिंग काऊंटर, "भाई, QR स्कॅन करा" म्हणालं की आपलं वर्चस्व टिकून राहतं.

पूर्वी ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येत नसे, त्याला विकत घेणं जड जायचं.
आता मात्र, धान्य काय  Amazon, Flipkart वर "Add to Cart" करणंही धाडसाचं झालंय.
कारण उचलायला पोतं नाही, पण "Pay Now" दाबताना हृदयाचं ठोके मात्र दुप्पट होतात!

"विचित्र आहे पण सत्य आहे…" आज ज्याला हवं ते मिळतं, ते Digital Wallet मध्ये मिळतं. UPI Transaction Free असलं तरी, खरी गंमत म्हणजे  Balance Always Zero…!
जगाला गंमत आणि देवाला किंमत  दोन्हीच Swipe Machine मध्ये अडकून पडलंय. आता चांगले मित्र आणि औषधं दोन्ही जीवनातील वेदना दूर करतात. फरक इतकाच  औषधं Medical Store मधून मिळतात, पण चांगले मित्र WhatsApp Group मध्ये ऑनलाईन दिसतात,
पण Reply करत नाहीत! 

मित्र म्हणजे आता "Last Seen at 12:05"
आणि औषध म्हणजे "Take Two Tablets Daily".
औषधांचा expiry date असतो, पण मित्रांचा  "Recharge Validity Date" असतो...रिचार्ज नॉऊ...

खरंच, हे डिजिटल युग वेगळंच आहे, भरलेला खिसा GPay ला झळकवतो,
आणि रिकामा खिसा "Send ₹1 to Verify" करून जगाला दाखवतो…!

आहे ना पुलंकीत डिजिटल युग...फक्त डिजिटल शब्दांची दुनिया....

सुनिल पुणेTM 9359850065.
sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?