Posts

Showing posts from September, 2025

33 कोटी देवाचा खरा अर्थ:

33 कोटी देवाचा खरा अर्थ: संस्कृतमधील "कोटी" या शब्दाला दोन अर्थ आहेत  1. कोटी = कोटी संख्या (crore) 2. कोटी = प्रकार, वर्ग (category, type) ऋग्वेद, यजुर्वेद आणि उपनिषदांमध्ये उल्लेखलेले तेहतीस कोटी देव हे ३३ प्रकारचे देवत्वाचे घटक आहेत, ३३ कोटी (संख्या) नव्हेत. *३३ [कोटी] देव कोणते ?* ८ वसु – अग्नि, पृथ्वी, वायु, अंतरिक्ष, आदित्य, द्यौ, चंद्र, नक्षत्र ११ रुद्र – (जीवनशक्तीशी, श्वासोच्छ्वासाशी आणि परिवर्तनाशी संबंधित) १२ आदित्य – (सूर्याच्या १२ रूपांप्रमाणे, कालचक्राशी संबंधित) २ अश्विनी कुमार – वैद्य व आरोग्य देवता ८ + ११ + १२ + २ = ३३ तात्त्विक अर्थ: वेदकाळात देव म्हणजे "दैवी शक्ती" किंवा "प्रकृतीतील ऊर्जा". म्हणजेच अग्नी, सूर्य, वायू, जल, पृथ्वी, चंद्र, तारे, आकाश, जीवनशक्ती, कालचक्र इत्यादी निसर्गातील मूलभूत शक्ती. माणसाने या शक्तींना दैवी मानून त्यांची पूजा केली. काळानुसार "कोटी" या शब्दाचा "प्रकार" हा अर्थ बाजूला राहिला आणि फक्त "कोटी = १,००,०००००" असा अर्थ लोकांच्या भाषेत प्रचलित झाला. त्यामुळे "३३ कोटी देव" = ...

"पोलीस" हे समाजाचे अदृश्य कवच..सुनिल पुणे 8007939422

"पोलीस" हे समाजाचे अदृश्य कवच..सुनिल पुणे 8007939422 "थँकलेस जॉब"… ही पदवी जिथे अचूक बसते ती म्हणजे पोलीस. रोज नावं ठेवली जातात, तक्रारी केल्या जातात, पण संकट आलं की लोकांना आठवण होते ती एकाच गणवेशाची ती पोलीसांच्या. मला आठवतो एक प्रसंग… मध्यरात्री एक अपघात झाला होता. सगळे घाबरलेले, लोकांनी फोन फिरवले  “112 व 108” पोलिस व ॲब्युलन्स येईल, नातेवाईक येतील…” पण सगळ्यांपेक्षा आधी, तिथे पोहोचला तो पोलीस. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माणसाला त्याने स्वतःच्या खांद्यावर उचललं आणि हॉस्पिटलपर्यंत नेलं. त्या क्षणी तो पोलीस नव्हता, तो माणुसकीचं मूर्त रूप होता. हेच खरं आहे. पोलीस म्हणजे फक्त कडक चेहऱ्याचा शिपाई नाही, तर संकटाच्या वेळी आधार देणारा खंबीर हात आहे. सण असो वा उत्सव, आंदोलन असो वा निवडणूक, वाहतूक असो वा गुन्हेगारी  प्रत्येक ठिकाणी सर्वप्रथम उभा राहणारा माणूस म्हणजे पोलीस. जनतेला पोलीस कधी त्रासदायक वाटतात, कधी राग येतो, पण मनाच्या तळाशी एक गोष्ट सगळ्यांना माहीत असते  “पोलीसांशिवाय आपलं रक्षण शक्य नाही.” हे नातं म्हणजे अगदी "लव्ह अँड हेट स्टोरी" सारखं आहे  “तु...

“नातं, आरोग्य, व्यापार व राजकारण इ." तुमचे लक्ष असेल तरच टिकतं” ... सुनिल पुणेTM

“नातं, आरोग्य, व्यापार व राजकारण इ." तुमचे लक्ष असेल तरच टिकतं” ... सुनिल पुणेTM तुम्ही ज्याच्यावर लक्ष देणे बंद कराल ते नष्ट होणारच ! हा वाक्यांश किती साधा आहे ना, तरी त्यात किती सत्य दडले आहे हे आपण रोजच्या जीवनात पाहतो. आरोग्याचे उदाहरण घ्या; सुरुवातीला थोडे थकवा, थोडी अस्वस्थता असो लक्ष दिलं नाही तर ती लवकरच मोठ्या आजारात रुपांतरित होते. आपलं शरीर आणि मन हे सतत जपण्याची आवश्यकता असलेले नाते आहे; त्यांच्याकडे दिलेले लक्ष म्हणजे वेळ, नीट आहार, व्यायाम आणि विश्रांती  हे छोटे छोटे प्रयत्न आपलं आयुष्य दीर्घकाल टिकवतात. लक्ष न दिल्यावर शरीर स्वतःहून काम करत नाही; ते आपल्याला वेदना आणि त्रासाच्या रूपात जागे करते. संपत्ती आणि व्यापार हेही त्याच नियमाखाली येतात. पैशाचं व्यवस्थापन, व्यवसायात सतत निगराणी, ग्राहकांच्या गरजांशी अद्ययावत राहणे हे सर्व लक्ष न देण्यासोबत कमी पडतात. अनेकदा लोक सुरुवातीला उत्तम काम करतात परंतु नंतर बाजारात सतत बदलत असलेले सूक्ष्म लक्षणे दुर्लक्षित करतात; नंतर त्यांना त्या बदलांचा तीव्र परिणाम भोगावा लागतो. संपत्ती वाढवायची असेल तर ती सतत पोषावी लागते, गुंतवणूक,...

लक्ष द्याल तरच सर्व टिकले बरर !... सुनिल पुणेTM

लक्ष द्याल तरच सर्व टिकले बरर !... सुनिल पुणेTM  तुम्ही ज्याच्यावर लक्ष देणे बंद कराल ते नष्ट होणारच ! हा वाक्यांश किती साधा आहे ना, तरी त्यात किती सत्य दडले आहे हे आपण रोजच्या जीवनात पाहतो. आरोग्याचे उदाहरण घ्या; सुरुवातीला थोडे थकवा, थोडी अस्वस्थता असो लक्ष दिलं नाही तर ती लवकरच मोठ्या आजारात रुपांतरित होते. आपलं शरीर आणि मन हे सतत जपण्याची आवश्यकता असलेले नाते आहे; त्यांच्याकडे दिलेले लक्ष म्हणजे वेळ, नीट आहार, व्यायाम आणि विश्रांती  हे छोटे छोटे प्रयत्न आपलं आयुष्य दीर्घकाल टिकवतात. लक्ष न दिल्यावर शरीर स्वतःहून काम करत नाही; ते आपल्याला वेदना आणि त्रासाच्या रूपात जागे करते. संपत्ती आणि व्यापार हेही त्याच नियमाखाली येतात. पैशाचं व्यवस्थापन, व्यवसायात सतत निगराणी, ग्राहकांच्या गरजांशी अद्ययावत राहणे हे सर्व लक्ष न देण्यासोबत कमी पडतात. अनेकदा लोक सुरुवातीला उत्तम काम करतात परंतु नंतर बाजारात सतत बदलत असलेले सूक्ष्म लक्षणे दुर्लक्षित करतात; नंतर त्यांना त्या बदलांचा तीव्र परिणाम भोगावा लागतो. संपत्ती वाढवायची असेल तर ती सतत पोषावी लागते, गुंतवणूक, बचत, ज्ञान आणि नेटवर्क या स...

"सून" पण आधी "मुलगी" होती, हीच आता सासुची मुलगी बनेल का ? सुनिल पुणे TM*

*"सून" पण आधी "मुलगी" होती, हीच आता सासुची मुलगी बनेल का ? सुनिल पुणे TM* आपल्या समाजात नेहमी एक वाक्य ऐकायला मिळतं  “मुलगी नसली की म्हातारपणी आधार नाही मिळत.” पण आयुष्य अनुभव देतं तेव्हा हे वाक्य खोटं ठरल्याचंही अनेकदा जाणवतं. आई-वडिलांच्या आयुष्यात मुलगा कमावतो, संसार उभा करतो, कुटुंबाचं नाव पुढे नेत राहतो. पण खरी माया, जिव्हाळा, आपलेपणाचा हात देणारी सून असते, हेही सत्य आहे. आईविषयीची जबाबदारी कधी कधी मुलगा नोकरी, व्यवसाय, व्यस्त जीवन या सगळ्यात गुंतून विसरतो. त्याला वृद्धाश्रम, सोयी-सुविधा हेच पर्याय सोपे वाटू लागतात. पण घराच्या उंबरठ्यावर आलेली सून जर हृदयाने समजूतदार असेल, तर तीच आईच्या हक्काची खरी मुलगी ठरते. कारण आईने एकटीने मुलाला वाढवलं, त्याच्या प्रत्येक गरजेसाठी स्वतःला झिजवलं, पण मुलगा मोठा झाल्यावर जर तो आईला दूर ठेवण्याचा विचार करतो, तर ती वेदना शब्दात सांगता येत नाही. त्या वेळी सुनेचं मन मोठं होतं. तीच पुढे येऊन म्हणते  “आईला दूर ठेवणं म्हणजे आपल्या संस्कारांचा अपमान आहे. पैसा कमावणं महत्त्वाचं असलं तरी आईच्या सहवासाची किंमत कधीच पैशात मोजता येत नाही....

पंगतीतलं मीठ आणि आयुष्यातली माणसं, सुनिल पुणेTM

पंगतीतलं मीठ आणि आयुष्यातली माणसं, सुनिल पुणेTM पंगतीत जेवताना जर मीठ वाढायला चुकलं, तर पुन्हा ते परत मिळत नाही. त्याचप्रमाणे काही माणसंही असतात जी एकदा आपल्या आयुष्यातून निघून गेली की पुन्हा कधीच परत येत नाहीत. गंमत म्हणजे, त्यांची खरी किंमत आपल्याला बहुतेक वेळा ते गेल्यावरच समजते. जेवणात गोड पदार्थ आला की आपलं सगळं लक्ष तिकडेच जातं. तो किती चविष्ट आहे, कशाच्या तुपात झालाय, त्याने त्रास होईल का नाही— या सगळ्या गोष्टी आपल्याला ठाऊक नसतात, पण तरीही मोहापायी तो गोड पदार्थ हवासा वाटतो. उलट, पानाच्या कडेला ठेवलेलं ते मीठ मात्र आपल्याला लक्षातही येत नाही. खारटपणा नकोसा वाटतो म्हणून आपणच त्याला दूर सारतो. अगदी ताटात रस्सा किंवा भाजी सांडली तरी ते मीठ असूनही निरुपयोगी ठरतं. अगदी असंच आपल्या आयुष्यातल्या मीठासारख्या माणसांबाबत घडतं. हे लोक आपल्याला परखड सल्ला देतात, आपलं चुकलं की प्रेमाने कान धरतात, पोटतिडकीने समजावतात. म्हणूनच ते अनेकदा नकोसे वाटतात. कारण त्यावेळी आपण गोड पदार्थाच्या मोहात अडकलोलेले असतो. बाकी सगळं दिसतं पण पानाच्या कडेवरचं ते थोडंसं मीठ मात्र दिसत नाही. पण जेव्हा त्या ...

खऱ्या संपत्तीची गोष्ट....!सुनिल पुणेTM

खऱ्या संपत्तीची गोष्ट....!सुनिल पुणेTM  एक व्यापारी होता. दिवस-रात्र तो पैशाच्या मागे धावत होता. व्यवहार, नफा, आकडे..हेच त्याच्या आयुष्याचे केंद्रबिंदू झाले होते. खिशाचे वजन इतके वाढले होते की शहरात त्याची प्रतिष्ठा, नाव आणि मानमरातब सगळीकडेच झळकत होतं. पण घरात मात्र वेगळं चित्र होतं. मुलांना त्याच्याशी बोलायला वेळ नव्हता, पत्नीचे हसरे चेहरे हरवले होते, आणि जुने मित्र त्याच्यापासून दुरावले होते. एके दिवशी व्यापाऱ्याने एक यशस्वी सौदा केला. लाखो रुपये हातात आले. घरी परतला, पण दारावर त्याचे स्वागत करणारे हसरे चेहरे नव्हते. शांतता होती, एकटेपणा होता. तेव्हा त्याला जाणवलं  “मी खिशाचं वजन वाढवलं, पण नात्यांचं वजन घटवलं… हा तर खुपच मोठा तोटा ठरला!” त्या रात्री त्याने स्वतःशीच संवाद साधला. त्याला उमगलं की खरी संपत्ती पैशात नसते, तर ती आपल्या नात्यांमध्ये दडलेली असते. मुलांसोबत घालवलेला वेळ, आई-वडिलांच्या पायाशी बसून केलेली दोन गप्पा, मित्रांसोबत केलेले हास्यविनोद, पार्टी, भटकंती, भांडण हेच तर खरे धन आहे. पैसा हा साधन आहे, पण नाती हीच खरी संपत्ती आहेत. माणूस कितीही श्रीमंत झाला तरी, जर...

अधुरं पण खरं नातं

"अधुरं पण खरं नातं"...सुनिल पुणेTM आयुष्यात प्रत्येक पुरुषाला एखाद्या टप्प्यावर एक अशी व्यक्ती भेटते, जी त्याला खऱ्या अर्थाने समजून घेते, स्वीकारते, आणि निस्वार्थ प्रेम देते. ही व्यक्ती म्हणजेच त्याची प्रेमिका. जगासमोर तो कितीही कठोर, कणखर किंवा जबाबदार वाटला तरी तिच्यासमोर मात्र तो अगदी सहजपणे स्वतःसारखा राहू शकतो. तिच्यासोबत बोलताना त्याला कुठलाही आव आणावा लागत नाही, मुखवटा लावावा लागत नाही. ती त्याच्या आयुष्यातली भावनिक शिदोरी असते. पुरुषाला पत्नी, मुलं, कुटुंब या सगळ्यांचा आधार असतोच, पण प्रेमिकेचं स्थान वेगळं असतं. कारण प्रेमिका त्याला शब्दांशिवाय समजते, डोळ्यांतल्या भावनेतून त्याचं मन वाचते. ती त्याचं अपयश स्वीकारते, त्याच्या दु:खात त्याच्या खांद्याला खांदा लावून उभी राहते, त्याला मनोबल देते. तिच्यासोबत तो त्याच्या भीती, शंका, असुरक्षितता, हतबलता अगदी निर्व्याजपणे बोलू शकतो. जगाच्या नजरेत तो कितीही यशस्वी पुरुष असला तरी तिच्यासमोर तो एक साधा माणूस बनतो. परंतु या गोड नात्यामागे एक कडू सत्य दडलं आहे. ते म्हणजे,  ही प्रेमिका बहुतेक वेळा त्या पुरुषाची पत्नी होऊ शकत नाही. पर...

"प्रेम आणि विश्वास" आयुष्यातील खरे दोन अदृश्य आधारस्तंभ, सुनिल पुणेTM.

"प्रेम आणि विश्वास" आयुष्यातील खरे दोन अदृश्य आधारस्तंभ, सुनिल पुणेTM. 'प्रेम' आणि 'विश्वास' या दोन गोष्टी माणसाच्या आयुष्याला इतक्या खोलवर जोडलेल्या असतात की त्यांचा अभाव म्हणजे जगता जगता हळूहळू मरण्यासारखं आहे. जगात पैसा, कीर्ती, यश, मान-सन्मान या गोष्टी लाखोंना मिळतात. पण प्रेम आणि विश्वास हे प्रत्येकाला मिळत नाहीत, कारण या दोन गोष्टींचं मोल सोन्याच्या तोळ्यात नाही, तर आत्म्याच्या गाभाऱ्यात आहे. प्रेम म्हणजे फक्त भावना नाही. ते एखाद्या व्यक्तीवर ओतलेलं आकर्षण नाही. प्रेम म्हणजे स्वतःला विसरून दुसऱ्याच्या आनंदात सुख शोधणं. जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो, तेव्हा त्याचं हास्य आपल्यासाठी विजय ठरतं आणि त्याचे अश्रू आपल्यासाठी पराभव. जगात सगळ्यांवर प्रेम करणं शक्य नाही, कारण प्रेम केलं की आपण आपल्या अस्तित्वाचा तुकडा त्या व्यक्तीकडे अर्पण करतो. म्हणूनच प्रेम निवडक असतं, दुर्मिळ असतं आणि म्हणूनच त्याचं मूल्य अपरंपार असतं. विश्वास म्हणजे न बोलता समजून घेणं. डोळ्यातून उमटलेल्या भावनांना न उच्चारता वाचणं. "तो आहे, म्हणून मी सुरक्षित आहे" अशी निःशब्द जाणीव. वि...

सुचलेल्या आणि चुकलेल्या गोष्टी लिहून ठेवण्याची माझी सवय

*सुचलेल्या आणि चुकलेल्या गोष्टी लिहून ठेवण्याची माझी सवय* लेखक सुनिल पुणे TM 8007939422 जीवनात काही क्षण असे येतात जे आपल्या मनावर कायमचा ठसा उमटवून जातात. पण जर आपण त्या क्षणांना शब्दांत पकडलं नाही, तर ते नुसतेच आठवणींच्या धुक्यात हरवून जातात. एखादी चांगली कल्पना सुचली, एखादी चूक घडली, किंवा एखादा अनुभव मनाला भिडला  त्या वेळेला लिहून ठेवणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याचं खरं जतन करणं होय. माझ्या आयुष्यातील पहिला परदेश प्रवास हाच या गोष्टीचा सर्वात मोठा पुरावा आहे. जर्मनीत पोहोचलो तेव्हा तिथल्या शिस्तीने अक्षरशः थक्क झालो होतो. रेल्वे, बस, अगदी छोट्या दुकानदारापर्यंत वेळेची काटेकोरता आणि जबाबदारीचं भान प्रत्येक ठिकाणी जाणवत होतं. एकदा रेल्वे स्टेशनवर मी थोडा उशिरा पोहोचलो आणि माझ्या डोळ्यासमोर गाडी मिनिटाच्या काट्यावर निघून गेली. त्या क्षणी ठरवलं की, “आपल्या जीवनात वेळेचं मूल्य कायम पाळायचं.” पण हाच विचार मी लगेच वहीत लिहून ठेवला नाही. वर्षांनंतर जाणवलं  तो अनुभव जर मी शब्दांत पकडला असता, तर तो निर्धार कायम माझ्या डोळ्यासमोर राहिला असता. फ्रान्समध्ये तर मनाने वेगळंच विश्व अनुभवलं. ...

मनाच्या नात्यांचे सामर्थ्य ! सुनिल

मनाच्या नात्यांचे सामर्थ्य ! सुनिल पुणेTM8007939422 आपल्या आयुष्यात अनेक लोक भेटतात  काही फक्त कौतुक करतात, तर काही खरंच आपल्यासाठी उभे राहतात. कौतुकाचे शब्द गोड असतात, पण ते फक्त कानाला सुखावतात. मात्र, खरी ताकद त्या एका व्यक्तीत असते जी आपल्याला प्रोत्साहन देते, आपल्या चुका दाखवते, पुन्हा उभं राहायला शिकवते आणि आयुष्यातील नकारात्मकतेवर मात करण्याची हिंमत देते. माणसाला खऱ्या अर्थाने मोठं बनवणारं हे प्रोत्साहन असतं. हजारो लोक तुमच्या यशाचा टाळ्या वाजवून गौरव करतील, पण संकटाच्या वेळी पाठीशी राहून “तू करू शकतोस” असं सांगणारी व्यक्तीच खरं नातं जपते. नाती रक्ताच्या नात्यांनीच घट्ट होत नाहीत. कधी कधी हक्काची नाती आपल्याला रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त आधार देतात. मैत्री, गुरू-शिष्य नातं, आयुष्यभर सोबत राहणारा जीवनसाथी, वा आई-वडिलांसारखं ममत्व देणारी एखादी व्यक्ती ही सगळी नाती रक्ताची नसली तरी हक्काने आपली असतात. सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे  त्या हक्काच्या माणसाकडे आपले मन नकळत मोकळे होते. त्याच्याकडे आपण काही लपवू शकत नाही, आणि त्याचा सहवास हवा हवासा वाटतो. एक क्षण त्याच्यासोबत गप्पा...

आजच्या बदलत्या काळातील कुटुंब आणि नात्यांचा प्रवास.

आजच्या बदलत्या काळातील कुटुंब आणि नात्यांचा प्रवास...सुनिल पुणेTM 8007939422.. आजचा समाज वेगाने बदलतोय. शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय या सगळ्या धावपळीत लग्नाचे वय वाढते आहे. ३० वर्षांनंतरही अनेक जण लग्नाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यातच "छोटे कुटुंब, सुखी कुटुंब" ही संकल्पना इतकी रुळली की, आता एकच मूल घेणे किंवा थेट एकल पालकत्व स्वीकारणे ही पद्धत समाजात झपाट्याने वाढते आहे. पण याचे दूरगामी परिणाम आहेत ते आपण विचारातच घेत नाही. पूर्वीच्या काळात पाच भाऊ, सहा बहिणी असा मोठा परिवार ही सामान्य गोष्ट होती. एकत्र कुटुंब पद्धतीत आपोआप असंख्य नाती तयार व्हायची. लग्ने झाल्यावर मुलं-बाळं झाली की नात्यांची शिदोरी अजून वाढायची. काका, काकू, मामा, मामी, मावशी, आत्या, चुलत भाऊ-बहिणी ही नाती आपल्याला मिळायची आणि त्यात मायेचा जिव्हाळा असायचा. आज मात्र चित्र पूर्णपणे उलटं झालं आहे. जेव्हा आपण एकल पालकत्व स्वीकारतो, तेव्हा काका, काकू, मामा, मामी, मावशी, आत्या, चुलत भाऊ-बहिण ही नाती जन्मालाच येणार नाहीत. एकच मूल म्हणजे पुढच्या पिढीला कोणतेही सख्खा, चुलतबंधू-भगिनी, काका, मावशी नसणे. परिणामी मुलां...

मैत्रीची ओलसर गोडी....!

मैत्रीची ओलसर गोडी....! सुनिल पुणेTM 8007939422 कोणी म्हणतं  “मैत्री बरबादी आहे ? ” पण खरं सांगायचं झालं, निभावणारे जर भेटले, तर तीच मैत्री आयुष्यभर हृदयाला ओलावा देत राहते. पुरुष असो वा स्त्री, प्रत्येकाच्या मनात काही अशा भावना असतात ज्या जगासमोर उघडता येत नाहीत. त्या भावना समजून घेणारा, त्या ऐकून घेणारा जर खरा मित्र मिळाला, तर मग आयुष्य कितीही कठीण असलं तरी सोपं वाटतं. स्त्रीची सखी असते जी तिचं मन मोकळं करते, तिच्या अश्रूंना जपते, तिच्या हसण्यातली खरी चमक ओळखते. पुरुषाची दोस्ती असते जी त्याला खांद्यावर हात ठेवून चालायला लावते, पडला तर उचलते, यशात टाळ्या वाजवते आणि अपयशात ढाल बनून उभी राहते. पण खरी मैत्री फक्त स्त्री-स्त्री किंवा पुरुष-पुरुष यांच्यातच नसते. एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यातही शुद्ध, प्रामाणिक मैत्री असते. जिथे कुठलाही स्वार्थ, कुठलीही शर्त नसते. फक्त मनाशी जोडलेला धागा असतो. तो धागा इतका नाजूक तरीही इतका मजबूत असतो की तो काळाच्या कसोटीवरही टिकतो. आज सोशल मीडियाच्या या युगात नात्यांची देवाण-घेवाण पटकन होते, तुटतेही पटकन. पण खरी मैत्री तीच जी समजून घेते, जपते आणि काळा...

नाती विरघळत चाललीत... एक सामाजिक शोकांतिका

*नाती विरघळत चाललीत... एक सामाजिक शोकांतिका* सुनिल पुणेTM  8007939422 आजकालच्या काळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते  नातेसंबंधांमधली दरी दिवसेंदिवस वाढते आहे. पूर्वी नाती ही फक्त रक्ताच्या नाळीने जोडलेली नव्हती, तर त्या मागे आपुलकी, प्रेम, आपसूक निर्माण होणारी जबाबदारी होती. काका-काकू, मामा-मामी, आत्या, चुलत भावंडं  कुणीही अडचणीत असेल, दुःखात असेल तर घरातल्या माणसाप्रमाणे धावून यायचे. लग्न असो, बाळंतपण असो, बारसं असो किंवा मृत्यूचा प्रसंग  प्रत्येक ठिकाणी नाती एकत्र यायची आणि दुःख-सुख वाटून घ्यायची. पण आज चित्र पूर्ण बदललं आहे. अलीकडेच ६ सप्टेंबर 2025. नाशिकला माझ्या लहान बहिणीचं दुःखद निधन झालं. अंत्यसंस्काराच्या वेळी मोजकेच लोक उपस्थित होते फक्त घरातील रक्तातील नात्यांची काका, काकू, आत्या,मामा मामी, बहीण भाऊ, काही शेजारीपाजारी व जवळचा मित्रपरिवार होता पण विस्तारित नातेसंबंधातील कुणी नव्हते. दुसऱ्या दिवशी अस्थी सावरण्याच्या विधीला तर फक्त घरातीलच माणसं होती. हे दृश्य पाहताना नकळत जुन्या काळातील दिवस आठवले. पूर्वी नात्यांच्या बंधनात जी ताकद होती, ती आज हळूहळू विरघळून चा...

५ सप्टेंबर, शिक्षक दिन : आयुष्यातील खरा मार्गदर्शक

*५ सप्टेंबर, शिक्षक दिन : आयुष्यातील खरा मार्गदर्शक* सुनिल पुणेTM 8007939422 ५ सप्टेंबर हा दिवस आपल्या देशात शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञानी आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. शिक्षक या शब्दाला आपल्या संस्कृतीत नेहमीच एक वेगळीच उंची देण्यात आली आहे. कारण शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर आयुष्याचा खरा अर्थ शिकवतो, मूल्यं रुजवतो आणि आपल्याला घडवतो. शाळेच्या पहिल्या वर्गात ज्यावेळी आपण अक्षर ओळखतो, त्या क्षणापासून आयुष्यभर चालणाऱ्या शिकण्याच्या प्रवासाची सुरुवात होते. "आई प्रथम तुम्हास शिकवते" सोबतच वडील तुमचे पहिले गुरू ठरतात" आणि नंतर आयुष्यात विविध टप्प्यांवर भेटणारे शिक्षक आपल्याला योग्य दिशा दाखवत राहतात. गणिताचा फॉर्म्युला शिकवणारा, इतिहासाची गोडी लावणारा, खेळात प्रोत्साहन देणारा, कला शिकवणारा प्रत्येक शिक्षक आपल्या मनावर ठसा उमटवतो. पण खरं सांगायचं तर शिक्षक केवळ शाळा व कॉलेजपुरते मर्यादित नसतात. आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी काही गुरू भेटतात. काही वेळा तो गुरु आपल्...

सकाळपासून संध्याकाळपर्यंत ताजेतवाने राहायचं रहस्य

सकाळपासून संध्याकाळपर्यंत ताजेतवाने राहायचं रहस्य, सुनिल पुणेTM 8007939422   सकाळच्या वेळी प्रत्येक गोष्ट स्वच्छ, निरभ्र वाटते. मन जणू शुद्ध झऱ्यासारखं असतं, शरीराला हलकेपण जाणवतं आणि विचारांचे आकाश निर्मळ असतं. पण जसजसा दिवस पुढे सरकतो, तसतसा आपला उत्साह कमी होत जातो. याचं खरं कारण थकवा नसतो, तर मनात नकळत साचत जाणारा तिरस्कार असतो.   परिस्थितीचा तिरस्कार मनाला जड करून टाकतो. जी वेळ आपल्याला काही शिकवण्यासाठी आली आहे, तिच्यावर नाराजी दाखवली की ती वेळ शत्रूप्रमाणे भासते. पण जर आपण तिचं स्वागत केलं, तर तीच वेळ आपल्याला परिपक्वतेकडे नेते.   माणसांचा तिरस्कार आपली ऊर्जा संपवतो. ज्या व्यक्तीकडे आपण राग, वैरभाव किंवा द्वेषाने पाहतो, त्याच्यापेक्षा आपणच अधिक थकतो. कारण त्या व्यक्तीचं अस्तित्व बाहेर असतं, पण त्याचा तिरस्कार सतत आपल्या मनात जिवंत राहत असतो. हा भार दिवसभराच्या शांततेवर आणि ताजेपणावर कुरघोडी करतो.   वस्तूंचा तिरस्कारही तितकाच धोकादायक आहे. वस्तू ही फक्त साधनं आहेत, पण आपण त्यांच्या स्वरूपावर नापसंती व्यक्त करतो. त्यातून मन संकुचित होतं आणि समाधान हरवून जातं. जे...

लग्नातील अवास्तव अपेक्षा, लग्न वय निघुन गेले तरी जुळत नाही आणि समाजाचे वास्तव.

*लग्नातील अवास्तव अपेक्षा, लग्न वय निघुन गेले तरी जुळत नाही आणि समाजाचे वास्तव* सुनिल पुणेTM 8007939422 आज आपल्या समाजात मुला-मुलींच्या लग्नाची एक गंभीर समस्या उभी ठाकली आहे. योग्य वयात नातं जुळून न येणं आणि जुळलं तरी टिकून न राहणं, या दोन्ही गोष्टींचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतं. त्यामागे अनेक कारणं आहेत, पालकांचा उशिरा होणारा विचार, नको त्या अपेक्षा, सासर-माहेर यांच्यातील विसंवाद आणि छोट्या-छोट्या कारणावरून होणारे वाद. पालकांची सर्वात मोठी चूक म्हणजे वेळेवर जागं न होणं. मुलगा मोठ्या पगारावर पोहोचला की आता लग्न करायचं असं वाटतं. मुलगी उच्चशिक्षण पूर्ण करेपर्यंत वाट बघितली जाते. पण या दरम्यान वय निघून जातं आणि योग्य जोड्या मिळणं कठीण होतं. त्यातच रंग, उंची, पगार, घर, पद यासारख्या अवास्तव अपेक्षा जोडल्या जातात. परिणामी चांगल्या जोड्या फक्त अपेक्षांच्या बोजामुळे मोडतात. यात वधू-वरांचाही दोष कमी नाही. आजची पिढी स्वतःच्या करिअर, सोशल मीडिया, मित्रपरिवार यामध्ये इतकी गुंतलेली आहे की लग्नानंतर जोडीदाराला वेळ, आदर आणि भावनिक आधार देणं विसरली आहे. छोट्या गोष्टींवरून वाद, जसं की Instagram क...