५ सप्टेंबर, शिक्षक दिन : आयुष्यातील खरा मार्गदर्शक
*५ सप्टेंबर, शिक्षक दिन : आयुष्यातील खरा मार्गदर्शक* सुनिल पुणेTM 8007939422
५ सप्टेंबर हा दिवस आपल्या देशात शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञानी आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. शिक्षक या शब्दाला आपल्या संस्कृतीत नेहमीच एक वेगळीच उंची देण्यात आली आहे. कारण शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर आयुष्याचा खरा अर्थ शिकवतो, मूल्यं रुजवतो आणि आपल्याला घडवतो.
शाळेच्या पहिल्या वर्गात ज्यावेळी आपण अक्षर ओळखतो, त्या क्षणापासून आयुष्यभर चालणाऱ्या शिकण्याच्या प्रवासाची सुरुवात होते. "आई प्रथम तुम्हास शिकवते" सोबतच वडील तुमचे पहिले गुरू ठरतात" आणि नंतर आयुष्यात विविध टप्प्यांवर भेटणारे शिक्षक आपल्याला योग्य दिशा दाखवत राहतात. गणिताचा फॉर्म्युला शिकवणारा, इतिहासाची गोडी लावणारा, खेळात प्रोत्साहन देणारा, कला शिकवणारा प्रत्येक शिक्षक आपल्या मनावर ठसा उमटवतो.
पण खरं सांगायचं तर शिक्षक केवळ शाळा व कॉलेजपुरते मर्यादित नसतात. आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी काही गुरू भेटतात. काही वेळा तो गुरु आपल्या आईवडिलांच्या रूपाने, काही वेळा मित्राच्या रूपाने, तर कधी जीवनानुभवांच्या रूपाने समोर येतो. जो आपल्या विचारांना नवा मार्ग दाखवतो, संकटात उभं राहायला शिकवतो, आणि यश व अपयश दोन्हींचं महत्त्व पटवतो, तोच खरा गुरू होय.
आजच्या वेगवान डिजीटल युगात तंत्रज्ञान, स्पर्धा, बदलती मूल्यं या सर्वांमध्ये शिक्षकांची भूमिका आणखीनच महत्त्वाची बनली आहे. कारण विद्यार्थ्याला केवळ नोकरीसाठीच नव्हे तर चांगला माणूस घडण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. ते काम एक सजग शिक्षकच करू शकतो.
या विशेष दिवशी आपण त्या सर्व शिक्षकांना वंदन करू या, ज्यांनी आपल्या आयुष्याचा मार्ग उजळवला, आपल्याला उभं राहायला शिकवलं आणि आपल्याला योग्य व्यक्ती बनवलं. तसेच, आपणही आपल्या कृतीतून इतरांसाठी काहीतरी चांगलं उदाहरण घालून दिलं, तर आपण स्वतः कुणाच्या तरी जीवनात गुरू ठरू शकतो.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
सुनिल पुणेTM 9359850065
( परिक्षक, लेखक, मॅनेजर, अध्यक्ष, सचिव, मार्गदर्शक, विविध राज्यस्तरीय पुरस्कार, )
sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment