33 कोटी देवाचा खरा अर्थ:
33 कोटी देवाचा खरा अर्थ:
संस्कृतमधील "कोटी" या शब्दाला दोन अर्थ आहेत
1. कोटी = कोटी संख्या (crore)
2. कोटी = प्रकार, वर्ग (category, type)
ऋग्वेद, यजुर्वेद आणि उपनिषदांमध्ये उल्लेखलेले तेहतीस कोटी देव हे ३३ प्रकारचे देवत्वाचे घटक आहेत, ३३ कोटी (संख्या) नव्हेत.
*३३ [कोटी] देव कोणते ?*
८ वसु – अग्नि, पृथ्वी, वायु, अंतरिक्ष, आदित्य, द्यौ, चंद्र, नक्षत्र
११ रुद्र – (जीवनशक्तीशी, श्वासोच्छ्वासाशी आणि परिवर्तनाशी संबंधित)
१२ आदित्य – (सूर्याच्या १२ रूपांप्रमाणे, कालचक्राशी संबंधित)
२ अश्विनी कुमार – वैद्य व आरोग्य देवता
८ + ११ + १२ + २ = ३३
तात्त्विक अर्थ:
वेदकाळात देव म्हणजे "दैवी शक्ती" किंवा "प्रकृतीतील ऊर्जा".
म्हणजेच अग्नी, सूर्य, वायू, जल, पृथ्वी, चंद्र, तारे, आकाश, जीवनशक्ती, कालचक्र इत्यादी निसर्गातील मूलभूत शक्ती.
माणसाने या शक्तींना दैवी मानून त्यांची पूजा केली.
काळानुसार "कोटी" या शब्दाचा "प्रकार" हा अर्थ बाजूला राहिला आणि फक्त "कोटी = १,००,०००००" असा अर्थ लोकांच्या भाषेत प्रचलित झाला. त्यामुळे "३३ कोटी देव" = "३३,००,००० देव" असा गैरसमज पसरला.
*"तेहतीस कोटी देव" म्हणजे निसर्गातील ३३ प्रकारचे दैवी तत्त्व; ३३ कोटी म्हणजे लाखोंची संख्या नाही.*
सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment