"पोलीस" हे समाजाचे अदृश्य कवच..सुनिल पुणे 8007939422

"पोलीस" हे समाजाचे अदृश्य कवच..सुनिल पुणे 8007939422

"थँकलेस जॉब"… ही पदवी जिथे अचूक बसते ती म्हणजे पोलीस.
रोज नावं ठेवली जातात, तक्रारी केल्या जातात, पण संकट आलं की लोकांना आठवण होते ती एकाच गणवेशाची ती पोलीसांच्या.

मला आठवतो एक प्रसंग…
मध्यरात्री एक अपघात झाला होता. सगळे घाबरलेले, लोकांनी फोन फिरवले  “112 व 108” पोलिस व ॲब्युलन्स येईल, नातेवाईक येतील…” पण सगळ्यांपेक्षा आधी, तिथे पोहोचला तो पोलीस. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माणसाला त्याने स्वतःच्या खांद्यावर उचललं आणि हॉस्पिटलपर्यंत नेलं.
त्या क्षणी तो पोलीस नव्हता, तो माणुसकीचं मूर्त रूप होता.

हेच खरं आहे.
पोलीस म्हणजे फक्त कडक चेहऱ्याचा शिपाई नाही, तर संकटाच्या वेळी आधार देणारा खंबीर हात आहे.
सण असो वा उत्सव, आंदोलन असो वा निवडणूक, वाहतूक असो वा गुन्हेगारी  प्रत्येक ठिकाणी सर्वप्रथम उभा राहणारा माणूस म्हणजे पोलीस.

जनतेला पोलीस कधी त्रासदायक वाटतात, कधी राग येतो, पण मनाच्या तळाशी एक गोष्ट सगळ्यांना माहीत असते 
“पोलीसांशिवाय आपलं रक्षण शक्य नाही.”
हे नातं म्हणजे अगदी "लव्ह अँड हेट स्टोरी" सारखं आहे  “तुझं माझं जमेना, पण तुझ्याविना करमेना.”

हो, पोलीस सुध्दा सामान्य माणसंच आहेत. त्यांचंही घर असतं, लेकरं असतात, सण-उत्सव असतात. पण जेव्हा आपल्याला दिवाळीत दिवे लावायला वेळ मिळतो, तेव्हा ते गर्दी सांभाळत असतात. जेव्हा आपण घरी सुखाने झोपतो, तेव्हा ते रस्त्यावर टॉर्च घेऊन गस्त घालत असतात.

आपल्या सुरक्षिततेची झोप गाढ लागते कारण कुणीतरी कुठेतरी जागं असतं…
आणि तो कुणीतरी म्हणजे  खाकी गणवेशधारी पोलीस.

म्हणूनच, समाजात जर खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करायची असेल, तर त्या खाकी गणवेशाला वाकून सलाम केला पाहिजे.
कारण तो गणवेश म्हणजे केवळ शिस्तीचं प्रतीक नाही, तर त्याग, जबाबदारी आणि माणुसकीचं जिवंत रूप आहे.

आज अनेक पोलीस शहिद झाले, आपल्या प्राणांची आहुती दिली, पण तिरंगा कधी झुकू दिला नाही. त्यांच्या कुटुंबांनी बलिदान सहन केलं, पण समाज सुरक्षित ठेवला.
त्यांच्या त्या बलिदानामुळे आपण निश्चिंतपणे जगू शकतो.

शेवटी एवढंच की..
“खाकी गणवेशाचा अभिमान जपा,
कारण याच गणवेशामुळे आपला तिरंगा नेहमी डौलाने फडकतो.” 🇮🇳


सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?