Posts

Showing posts from June, 2026

एक वचनी, एक पत्नी ! एक पती, एक संसार !!

डिजिटल युगातील नव वधू वरांसाठी एक मनोगत !  एक वचनी, एक पत्नी !  एक पती, एक संसार !! लेखक सुनिल पुणेTM 93598 50065  आजच्या डिजिटल युगात मोबाईलच्या एका क्लिकवर हजारो चेहरे दिसतात, शेकडो मैत्रीच्या विनंत्या येतात आणि असंख्य पर्याय उपलब्ध असतात. पण जीवनसाथी निवडणे ही केवळ "ऑनलाईन निवड" नसून संपूर्ण आयुष्याची जबाबदारी असते. पूर्वी आई वडील, नातेवाईक आणि समाज यांच्या अनुभवातून स्थळे पाहिली जात होती. आज मुला मुलींना स्वतः निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र स्वातंत्र्यासोबत जबाबदारीही तितकीच मोठी असते. जीवनसाथी निवडताना चेहरा, पैसा, नोकरी, गाडी, बंगला यापेक्षा स्वभाव, संस्कार, प्रामाणिकपणा, कुटुंबाविषयी आदर आणि संकटात साथ देण्याची तयारी या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात. कारण सौंदर्य काळानुसार बदलते, संपत्ती कमी जास्त होते, पण चांगला स्वभाव आणि निष्ठा आयुष्यभर टिकते. आज अनेक तरुण-तरुणी सोशल मीडियावरील आकर्षणाला प्रेम समजतात. पण खरे प्रेम म्हणजे एकमेकांचा सन्मान, विश्वास आणि आयुष्यभराची साथ. लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचा नव्हे तर दोन कुटुंबांचा मिल...

सेवानिवृत्ती: आयुष्याचा संध्याकाळ नव्हे, तर आत्मशोधाचा सुवर्णकाळ....!

सेवानिवृत्ती: आयुष्याचा संध्याकाळ नव्हे, तर आत्मशोधाचा सुवर्णकाळ....! लेखक: सुनिल पुणेTM 93598 50065  मानवी आयुष्याचा प्रवास हा ऋतूंसारखा असतो. बालपणाचा वसंत, तरुणपणाचा उन्मेष, प्रौढत्वाची जबाबदारी आणि शेवटी येणारा परिपक्वतेचा शांत, संयमी काळ. सेवानिवृत्ती म्हणजे या प्रवासाचा शेवट नसतो; उलट ती आयुष्याला नव्या दृष्टीने पाहण्याची, स्वतःला नव्याने शोधण्याची आणि जगण्याचा खरा अर्थ अनुभवण्याची एक सुंदर संधी असते. नोकरीच्या काळात माणूस आपल्या पदाशी, अधिकाराशी आणि ओळखीशी इतका एकरूप होऊन जातो की त्यालाच स्वतःचे अस्तित्व समजू लागते. अनेक वर्षे कार्यालय, व्यवसाय, जबाबदाऱ्या आणि धावपळ यांच्यात गेलेली असतात. पण एक दिवस असा येतो, जेव्हा त्या साऱ्या जबाबदाऱ्यांचा अध्याय संपतो आणि जीवन एका नव्या वळणावर येऊन उभे राहते. सेवानिवृत्तीनंतर सुरुवातीच्या काही वर्षांत माणसाला जाणवू लागते की ज्या संस्थेत, कार्यालयात किंवा क्षेत्रात त्याने आयुष्याची अनेक वर्षे घालवली, ते जग आता त्याच्याशिवायही सुरळीत चालत आहे. कालपर्यंत ज्याच्या निर्णयांना महत्त्व होते, त्याला आता एक सामान्य नागरिक म्हणून पाहिले जाते. ही वस...

समागम तीचा निर्णय, त्याची जबाबदारी आणि नात्याचं खरं रूप.

समागम तीचा निर्णय, त्याची जबाबदारी आणि नात्याचं खरं रूप....लेखक सुनिल पुणेTM 9359850065. प्रेम, लग्न आणि जीवनसाथी या नात्यांमध्ये जे दिसतं तेच खरं असतं असं आपण मानतो, पण वास्तव त्याहून खूप खोल असतं. अनेक नाती बाहेरून व्यवस्थित दिसतात, पण आतून हळूहळू तुटत असतात. त्यामागचं कारण एकच नसतं, पण एक महत्त्वाचा आणि अनेकदा दुर्लक्षित राहणारा भाग म्हणजे लैंगिकतेबद्दलची समज आणि त्यातली जबाबदारी. लैंगिक संबंध होतील की नाही, हा निर्णय केवळ स्त्रीचा असतो. कारण तिचं शरीर, तिचं मन आणि तिच्या भावनांवर तिचाच पूर्ण अधिकार असतो. तिला केव्हा, कसं आणि कोणासोबत जवळीक साधायची हे ठरवण्याचं स्वातंत्र्य तिचं असतं आणि ते तसं असायलाच हवं. हा फक्त अधिकार नाही तर तिच्या स्वाभिमानाचा, तिच्या सुरक्षिततेचा आणि तिच्या अस्तित्वाचा भाग आहे. ती जेव्हा कोणावर विश्वास ठेवते आणि त्या नात्यात स्वतःला पूर्णपणे समर्पित करण्याचा निर्णय घेते, तेव्हा तो केवळ एक शारीरिक क्षण नसतो. तो तिच्या आयुष्यातील एक मोठा भावनिक टप्पा असतो. पण इथून पुढे नातं कसं वळण घेतं, हे अनेकदा पुरुषाच्या वागण्यावर अवलंबून असतं. कारण लैंगिक संबंधानंतर नातं के...

"बॉयफ्रेंड शोधताना हृदय, नवरा शोधताना कॅल्क्युलेटर!"

Image
लग्न करायला चांगला नवरा मिळत नाही, मग बॉयफ्रेंड कसे मिळतात ?  लेखक सुनिल पुणेTM 93598 50065  आजकाल अनेक मुलींच्या तोंडी एक वाक्य हमखास ऐकायला मिळतं  "लग्नासाठी चांगला मुलगा मिळत नाही हो!" हे वाक्य ऐकलं की माझ्या मनात नेहमी एक साधा प्रश्न उभा राहतो  मग बॉयफ्रेंड कसे मिळतात? कारण कॉलेजपासून ऑफिसपर्यंत, बसस्टॉपपासून सोशल मीडियापर्यंत, मित्र शोधण्याची प्रक्रिया अगदी वेगाने चालू असते. फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली जाते, इंस्टाग्रामवर लाईक्सची देवाणघेवाण होते, व्हॉट्सअॅपवर गुड मॉर्निंगची फुले उमलतात आणि काही दिवसांत "फक्त मित्र" हा शब्द "स्पेशल फ्रेंड" पर्यंत पोहोचतो. तेव्हा कुणी उंची मोजत नाही, पगाराची स्लिप मागत नाही, बँक बॅलन्स तपासत नाही किंवा स्वतःचं घर आहे का याची चौकशी करत नाही. पण ज्या क्षणी लग्नाचा विषय निघतो, तेव्हा अचानक सगळे निकष जागे होतात. मुलगा उंच हवा, पगार मोठा हवा, स्वतःचं घर हवं, चारचाकी हवी, सवयी चांगल्या हव्यात, व्यसन नसावं, सासू-सासरे समजूतदार हवेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलगा देखणा हवा! म्हणजे थोडक्यात सांगायचं तर, ...

कुटाना

Image
"कुटाना" – एक शब्द, हजार संशय ! लेखक : सुनिल पुणेTM 93598 50065  मराठी भाषेतील काही शब्द असे असतात की त्यांचा शब्दकोशात अर्थ शोधायला जाऊ नका. कारण त्यांचा खरा अर्थ लोकांच्या चेहऱ्यावर, नजरेत आणि कुजबुजीत सापडतो. त्यापैकीच एक भन्नाट शब्द म्हणजे  "कुटाना". हा शब्द कानावर पडला की समोरच्याच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित उमटतं. कुणी सरळ अर्थ सांगत नाही, पण सगळ्यांना अर्थ कळलेला असतो. गावातील चौक असो, शहरातील कट्टा असो किंवा व्हॉट्सॲप ग्रुप असो, एखाद्या व्यक्तीच्या नावापुढे "कुटाना" हा शब्द जोडला की चर्चेला उधाण येतं. खरं तर हा शब्द जन्माला येतो तो संशयातून. नवरा जरा जास्त फोनवर बोलू लागला, पत्नी अचानक सजूनधजून बाहेर जाऊ लागली, मोबाईलला पासवर्ड लागला, रात्री उशिरा "ऑफिसचं काम" वाढलं की समाजातील काही स्वयंघोषित गुप्तहेर लगेच निष्कर्ष काढतात "काहीतरी कुटाना चाललंय!" आपल्या समाजात एक गंमत आहे. लोकांना स्वतःच्या घरातील गळणारा नळ दिसत नाही, पण शेजाऱ्यांच्या घरातील पडदा जरा हलला तरी त्यामागची कथा तयार होते. आणि मग अफवांचा कारखाना सुरू होतो....