“प्रेम" वयाच्या पलीकडचं पण एक सुंदर सत्य”

“प्रेम" वयाच्या पलीकडचं पण एक सुंदर सत्य” लेखक सुनिल पुणेTM 9359850065

तिच्या चेहऱ्यावरची ती हलकीशी स्मितरेषा डोळ्यांतली शांत चमक आणि कपाळावरचा तो छोटासा काळा ठिपका  जणू आयुष्याने दिलेल्या अनुभवांची साक्ष देत होता. पण त्या सगळ्यांपेक्षा अधिक काहीतरी होतं तिच्यात ते म्हणजे समजून घेणारं मन.

लोक नेहमी विचारतात  “प्रेमाला वय असतं का?”
पण खरा प्रश्न हा आहे की, प्रेमाला मर्यादा असते का?

आयुष्यात काही नाती अचानक येतात कुठलीही पूर्वतयारी नसताना. सुरुवातीला वाटतं, ही फक्त ओळख आहे नंतर मैत्री होते आणि मग एक दिवस लक्षात येतं 
हे फक्त नातं नाही, हे तर मनाचं घर बनलंय.

प्रेम तेव्हाच सुंदर होतं, जेव्हा कोणी तुमचं बोलणं ऐकतं म्हणून नाही तर तुमचं न बोललेलंही समजून घेतं.
जिथे शब्द कमी पडतात, तिथे भावना संवाद साधतात आणि जिथे मन जुळतं, तिथे वय, अंतर, परिस्थिती  सगळं गौण ठरतं.

खरं प्रेम म्हणजे रोज “I love you” म्हणणं नाही
तर एखाद्या दिवशी शांत बसूनही एकमेकांची साथ जाणवणं आहे.

ती म्हणाली होती,
“माझ्या आयुष्यात खूप लोक आले पण जे माझ्या मनाला समजून घेतलं, ते खूप कमी”

आणि तो हसून म्हणाला,
“मला तुझं सगळं समजायला नको फक्त तू जेव्हा हरवशील, तेव्हा तुला सापडायला मी असलो पाहिजे”

हेच तर प्रेम आहे
जिथे हक्क नसतो, पण आपलेपण असतं
जिथे अपेक्षा नसतात, पण विश्वास असतो

कधी कधी आयुष्य खूप काही हिसकावून घेतं
पण त्याच वेळी, ते एक अशी व्यक्ती देतं  जी तुमचं सगळं भरून काढते.

मग त्या नात्याला वयाचं बंधन का असावं?
जिथे मन जुळतं, तिथे वर्षांची गणितं कोण मोजतं?

प्रेम म्हणजे एखाद्या चेहऱ्यावरचं सौंदर्य नाही
तर त्या चेहऱ्यामागे लपलेल्या मनाची ओळख आहे.
आणि ज्या दिवशी ती ओळख होते त्या दिवशी
प्रेम फक्त भावना राहत नाही ते आयुष्य बनतं.
म्हणूनच
प्रेमाला कधी वयाची मर्यादा नसते
जिथे मन समजून घेतलं जातं,
जिथे हृदय भरून येतं,
तिथेच खरं सुंदर आणि कायमचं प्रेम जन्म घेतं 

लेखक:सुनिल पुणेTM 9359850065, topsunil@gmail.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?