Posts

सोशल मिडियावरील गृप की "गृपारिझम"?

सोशल मिडियावरील गृप की "गृपारिझम"? (प्रत्येक ग्रुपमधल्या मनमिळावूपणाची आणि मत व मनभेदाची सत्यकथा) Sunil Pune TM "गृप"  हा शब्द खूप सामान्य वाटतो, पण त्यामागचं जग मात्र खूप वेगळं आणि गुंतागुंतीचं असतं. सुरुवात होते ती केवळ ३–४ जिवलग मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन गप्पा मारायच्या, आठवड्यातून एकदा भेटायचं, वाढदिवस, सण साजरे करायचे असा एक सकारात्मक, मनाला समाधान देणारा हेतू घेऊनच,  पण जसजसं सदस्यसंख्येचं प्रमाण वाढत जातं, तसतसे विचारांचे, दृष्टिकोनांचे, स्वभावांचे फरक समोर यायला लागतात. ज्यांनी गृप सुरू केला, त्यांची एकत्रित भावना, मैत्रीचा ओलावा काहीसा विरून जातो..याच प्रक्रियेला मी "गृपारिझम" असं नाव देतो  जिथे "गृप" हा शब्द फक्त नावापुरता राहतो आणि "इझम" म्हणजे एक विचारधारा, एक कल, एक वेगळं वळण घेण्याची सुरुवात होते. गृपारिझमची लक्षणं काय? गृपामध्ये जेव्हा सदस्यांच्या भावना, मतं, अपेक्षा यांचं टकराव होतो, तेव्हा गैरसमजांचं वावटळ सुरू होतं. कोणी कोणावर काही बोललं, कोणाचं रिप्लाय न आला, कोणाच्या जोकला हसावं का रागवावं... हे सगळं एकमेकांबद्दल...

"परिस्थिती आणि माणसं, आपलेपणाची खरी परीक्षा!"

"परिस्थिती आणि माणसं,  आपलेपणाची खरी परीक्षा!" लेखक  सुनिल पुणे TM "हे पटणार नाही, पण सत्य हेच की लोक आपली परिस्थिती पाहूनच आपल्याशी संबंध जोडतात..." हे वाक्य जितकं कटू आहे, तितकंच ते सत्यही आहे. पण हे सत्य फक्त अर्धंवट आहे. कारण यात माणसांची स्वार्थी बाजू दिसते, पण दुसरी बाजूही आहे  ती समजून घ्यायला हवी. आपण सगळेच हे अनुभवलेलं असतं. जेव्हा आपण यशाच्या शिखरावर असतो, तेव्हा सगळे "आपले" वाटतात. फोन वाजतात, कौतुक होतं, खांद्यावर थाप दिली जाते, आणि प्रत्येकाला आपल्या यशात थोडीशी जागा हवी असते. आपण एखादा मोठा करार जिंकतो, छान फोटोशूट करतो, नाव येतं तेव्हा "आपण आहे म्हणून" लोक येतात. पण… एकदा का परिस्थिती उलटी झाली, व्यवसाय थोडा डगमगला, आर्थिक चक्र थांबलं, थोडं मागे पडलो, की हीच मंडळी अनोळखी होतात. ज्यांनी आपल्याला "भाऊ", "मैत्र" किंवा "सर" म्हणून हाक मारली होती, ते हळूहळू मूक होतात. काहीजण तर आपल्याला टाळतातही. का? कारण त्यांना आपली परिस्थिती नकोशी वाटते. त्यांच्या नजरेत ‘status’ महत्वाचा असतो, माणूस नाही. पण सगळेच असे नस...

"36 गुण जुळणे" म्हणजे काय?

"36 गुण जुळणे" म्हणजे काय?  आपण नेहमी ऐकतो, "36 गुण जुळले का?" पण हे गुण फक्त मुलीचे असतात का? नाही! 👉 हे गुण वधू आणि वर  दोघांच्या कुंडलीतील असतात. जन्म, वेळ, स्थळ यावरून दोघांच्या कुंडल्या मॅच करून एकूण 36 गुणांपैकी किती गुण जुळतात ते पाहिले जाते. 🌟 अष्टकूट मिलान नावाची प्रणाली आहे, जी 8 प्रकारांमध्ये हे गुण मोजते जसे की स्वभाव, आरोग्य, संतती, मानसिक जुळव, शारीरिक सुसंगतता इत्यादी. ✅ 18 गुणांपेक्षा कमी – लग्नास अयोग्य ✅ 18 ते 24 – मध्यम ✅ 25 ते 32 – उत्तम ✅ 33 ते 36 – सर्वोत्तम जुळव पण लक्षात ठेवा... 🌹 गुण जुळणे हे एक मार्गदर्शन आहे, अंतिम सत्य नाही. खरे जुळव असते ते प्रेम, समजूतदारपणा आणि परस्पर सन्मान. 🙏 आपल्या आयुष्यातला जोडीदार निवडताना केवळ गुण नव्हे तर "मनाचे गुण" अधिक महत्त्वाचे! सुनिल पुणे TM, 9359850065, sunilpunetm.blogspot.com

"सासू-सून यांचेही 36 गुण जुळायला हवेत! जसे वधु-वराचे असतात"

"सासू-सून यांचेही 36 गुण जुळायला हवेत! जसे वधु-वराचे असतात" लेखक सुनिल पुणे TM 8007939422 लग्न जमवताना आपण वधू-वराचे 36 गुण जुळतात का हे पाहतो... पण एक महत्वाचे, गुणमिलनाचा विषय आपण विसरतो सासू आणि सून यांचे गुण किती जुळतात? हो, ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण ही मांडणी प्रत्येक घरासाठी आणि प्रत्येक स्त्रीसाठी खूप उपयोगी आहे.  कारण सासूबाई आणि सून यांचे गुण का जुळावेत बर ? कारण जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीशी जोडली जाते, जी सासू  तिच्या आईसारखी असावी अशी अपेक्षा असते, आणि दुसरीकडे एक आई पुत्राच्या निवडीला स्वीकारून सूनेला लेकीसारखं मानण्याचा प्रयत्न करते. पण या नात्यातही काही "गुण" जुळायला हवेतच, ज्यामुळे हे नातं फुलतं, बहरतं आणि घराला खऱ्या अर्थानं ‘गृहसौख्य’ लाभतं. सासू-सून यांचे "अदृश्य गुण" कोणते असावेत? यासाठी आपण थोडं वेगळेपणाने "36 गुणमिलन" करूया, ज्यात खालील गुणाचा विचारात करू यात. समजूतदारपणा असावा, एकमेकांच्या चुका स्वीकारण्याची तयारी असावी व ऐकून घेण्याची कला ही फक्त बोलणं नाही तर ती ऐकणंही महत्त्वाचं आहे. एकमेकींवर विश्वास, शंका न करता ...

"समजूतदार नात्यांचा गाभा काय तर स्त्री आणि पुरुष यांच्यातील परस्पर समज"

*"समजूतदार नात्यांचा गाभा काय तर स्त्री आणि पुरुष यांच्यातील परस्पर समज"* (सुनिल पुणेTM 8007939422) आजच्या डिजिटल युगात आपण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खूप पुढे आलो आहोत, पण या प्रगतीच्या गडगडाटात एक गोष्ट हळूहळू हरवत चालली आहे  ती म्हणजे "मनाच्या गाभ्याची समज". विशेषतः स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंधांमध्ये ही समज अजूनही तितकीशी रुजलेली नाही, जितकी असायला हवी. पुरुषाने स्त्रीच्या मनाचा गाभा समजून घेणे हे फक्त तिच्या भावना समजणे नव्हे, तर तिच्या विचारांचा, तिच्या धडपडीचा आणि तिच्या अबोल वेदनांचा सन्मान करणे होय. ती कधी आई असते, कधी पत्नी, कधी बहीण आणि कधी सखीही असते  पण प्रत्येक भूमिकेत ती प्रेम देते, समर्पण करते आणि न बोलता खूप काही सहन करते. स्त्रीच्या नाजूक मनाला आणि तिच्या स्वप्नांना आदराने हात लावणं, तिच्या अस्तित्वाचं कौतुक करणं हे खऱ्या अर्थाने पुरुषत्व आहे. पण याच वेळी हे देखील तितकंच खरं आहे की, स्त्रीनेही पुरुषाच्या भावविश्वाला समजून घेणं गरजेचं आहे. पुरुषांमध्ये भावना कमी आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. अनेकदा ते गप्प राहतात, पण त्यांच्यामध्येही भीती, अप...

"आपुलकीच्या नात्यांना दुसऱ्याच्या शब्दांनी नात्यातील विश्वास फाटू देऊ नकोस..."

"आपुलकीच्या नात्यांना दुसऱ्याच्या शब्दांनी नात्यातील विश्वास फाटू देऊ नकोस..." सुनिल पुणे TM 8007939422 प्रिय  माणसाला नात्यांमध्ये गुंतवणं हे नैसर्गिक आहे, पण ते नातं जपणं मात्र एक कला आहे. आणि दुर्दैवाने आजच्या काळात ही कला हरवत चालली आहे... विशेषतः जेव्हा आपण आपलं मन दुसऱ्याच्या म्हणण्यावर ठेऊन, आपल्या अगदी जवळच्या माणसांपासून दुरावतो. माझं एकच सांगणं आहे  दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची माणसं तोडू नका...कारण हे जग कधीच निष्पाप नव्हतं. जगाची जुनी सवयच आहे की काडी टाकून आग लावायची, आणि मग स्वतः शांतपणे त्या आगीत उब घेत बसायचं! कोण किती जवळचं आहे, हे तुम्हाला समजत असताना कुणाच्या तरी बोलण्याने त्या नात्यावर शंका घेणं,  ही आपल्या माणसांवर अन्यायच ठरतो. आपण आपलेपणाने नातं जोपासतो, त्यात ओल ठेवतो, भावना गुंतवतो… आणि कुणीतरी एकतर्फी सांगितलेलं काहीतरी ऐकून आपणच फूट घालतो? हा न्याय आहे का? आज तुम्ही जर एखाद्या आपुलकीच्या माणसापासून फक्त राग, गैरसमज किंवा कुणाच्या बोलण्यामुळे दूर झालात… तर कदाचित उद्या तुम्हालाच समजेल की ज्याचं नुकसान झालंय ते तुमचंच आहे. कारण... नात्...

स्त्रीचं समजून घेणं आणि खरं प्रेम, एक नाजूक समर्पण

स्त्रीचं समजून घेणं आणि खरं प्रेम, एक नाजूक समर्पण लेखक – Sunil Pune TM "इतरांना समजावून सांगण्यापेक्षा स्वतःला समजावून सांगणं सोपं असतं", ही ओळ जशी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर लागू होते, तशीच ती एका प्रेमळ स्त्रीच्या जीवनात खोलवर रुतलेली असते. एक स्त्री जेव्हा प्रेम करते, तेव्हा ती अपेक्षा करत नाही, फक्त समजून घेण्याची इच्छा बाळगते. पण दुर्दैव म्हणजे, तिचे खरे प्रेम अनेकदा गैरसमजाच्या वादळात अडकते. ती समजून घेण्याच्या प्रयत्नात स्वतःला पूर्णपणे विसरते आणि अखेर आपल्याच अस्तित्वाचा बळी देते. ती कुठलाही प्रसंग बोलून व्यक्त करत नाही, ती केवळ नजरेतून, कृतीतून, आपल्या छोट्या छोट्या सवयींतून भावना दाखवते. पण समोरच्याने त्या भावना समजून घ्याव्यात, अशी तिची मूक अपेक्षा असते. जेव्हा हे अपेक्षांचे ऋणानुबंध गैरसमजात गुंततात, तेव्हा ती स्त्री कुणावरही दोष न देता स्वतःलाच बदलते...आणि हेच तिचं समर्पण असतं! इथेच तिचाच बळी जातो. कधी कधी, एक साधा शब्द, एक स्पष्ट संवाद, किंवा एक विश्वासाचं हसणं हे खूप काही सांगू शकलं असतं, पण पुरुष समजून घ्यायच्या आधीच नातं तुटलेलं असतं. कारण  "ज्याला ...