Posts

समर्थ रामदास स्वामी व गणपतीची आरती

*समर्थ रामदास स्वामी व गणपतीची आरती* सुनिल पुणे TM 8007939423 समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील थोर संत, समाजसुधारक व भक्ती-मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या वाङ्मयातून भक्ती, निष्ठा आणि राष्ट्रप्रेम यांचा दिव्य संदेश दिला. त्यांच्या ग्रंथांमध्ये दासबोध, मनाचे श्लोक, विविध स्तोत्रे, अभंग व आरत्या प्रसिद्ध आहेत. गणपतीबाबत त्यांनी रचलेली सर्वात प्रसिद्ध आरती म्हणजे,  *"सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची"* ही आरती आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि बाहेरही गणेशोत्सवात, मंदिरात आणि घराघरांत रोज भक्तिभावाने गायली जाते. मोरेश्वर मंदिर हे पुणे जिल्ह्यातील मोरेगाव (अष्टविनायक पैकी पहिले स्थान) येथे आहे. परंपरेनुसार, समर्थ रामदास स्वामी जेव्हा महाराष्ट्रभर फिरत होते, तेव्हा त्यांनी मोरेश्वर मंदिराला भेट दिली होती. त्या वेळी गणपतीच्या महतीचे स्मरण करून त्यांनी "सुखकर्ता दुःखहर्ता" ही आरती येथेच रचली होती, यामध्ये गणपतीला "सुखकर्ता" म्हणजे सुख, आनंद देणारा आणि "दुःखहर्ता" म्हणजे संकट व दुःख दूर करणारा देव म्हणून गौरविले आहे. आरतीत विघ्नहर्ता, मंग...

"एक स्त्री" तिच्यावर होणारा रोजचा नजरेतील बलात्कार

"एक स्त्री" तिच्यावर होणारा रोजचा नजरेतील  बलात्कार लेखक  सुनिल पुणे TM 8007939422 "मी एक स्त्री आहे... माझं स्वतःचं मन आहे, विचार आहेत, स्वप्नं आहेत. पण हे सगळं जगाला दिसतच नाही. रस्त्यावर पाऊल टाकताच मला आधी जाणवतात त्या नजरा… ज्या माझ्या डोळ्यांना भिडत नाहीत, पण माझ्या शरीरावरून घसरत राहतात. हो, रोजचा बलात्कार मी सहन करते,  शब्दांनी नाही, हातांनी नाही, पण नजरेने. एखादी टवाळटवाळ टिप्पणी, एखादा शिट्टीचा आवाज, किंवा एखादी घाणेरडी नजर मला आतून कितीदा मारते हे कुणालाच कळत नाही. मी घराबाहेर निघताना माझ्या वेशभूषेबद्दल, चालण्याबद्दल, बोलण्याबद्दल विचार करते. का? कारण मला माझ्या सुरक्षेबद्दल काळजी असते. पण खरं तर मला नाही बदलायचं, बदलायला हवेत त्या नजरांना, त्या विचारांना. शारीरिक अत्याचार एकदाच होतो आणि त्याच्या जखमा दिसतात. पण नजरेचा बलात्कार रोज होतो, शेकडो वेळा होतो आणि त्या जखमा कुणालाच दिसत नाहीत,  कारण त्या आत खोलवर उमटतात...मला हवं आहे तेवढंच माझ्या अस्तित्वाकडे बघा, माझ्या क्षमतेकडे बघा, माझ्या विचारांकडे बघा. मी केवळ शरीर नाही. मी आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे, पत...

सोशल मीडियावरील नाती किती खरीखुरी पुणेरी आवृत्ती..!

सोशल मीडियावरील नाती किती खरीखुरी पुणेरी आवृत्ती..! सुनिल पुणेTM 8007939422 आजकाल सोशल मीडियावर लगेच स्त्री पुरूष ओळख वा प्रेम जुळतं ? म्हणजे! पण खरं सांगू का? हे “प्रेम” म्हणजे काय तर  “हाय, हेलो, गुड मॉर्निंग” पासून सुरू होतं, आणि दोन दिवसात मग थेट  “जरा पैसे पाठव ना, अडचण आहे” इथपर्यंत पोचतं. आणि नाही पाठवलं तर नातं संपलं. एवढंच ते ओळख प्रेम. आणि जर पुरुषाने फक्त शरीरसुखासाठी स्त्रीबरोबर नातं केलं, तर तो “खलनायक” ठरतो. पण बाईने जर फक्त पैशासाठी नातं केलं, तर ती “त्यागमूर्ती” ? पण तस नाही हो! दोन्ही सारखेच चुकीचे आहे. मैत्री वा प्रेम म्हटलं की त्यात आदर आणि विश्वास हवाच. बाकीचा “स्वार्थ” म्हणजे थेट कचऱ्याच्या बादलीत टाकायच्या वस्तू सारखेच होईल. पण पुण्यात आम्ही थोडक्यात सांगतो की..  “खर्‍या प्रेमात शरीराचं आकर्षण चालतं, पैशाचं लोभ लगेच चालत नाही.”  “गोड बोलणाऱ्यांपासून जपून रहा, कारण गोड बोलणं म्हणजे सर्वच बिलकुल फुकटात मिळेल अस नाही.” आजच्या सोशल मीडियावरची ९०% नाती ही “फुकटात सुख, लगेच उधारीत खर्च” या धर्तीवर चालतात. आणि मग पुढे काय होतं? बातमी व चर्चा  ...

जीव लावलेला असतो म्हणून तर त्रास होतो…

जीव लावलेला असतो म्हणून तर त्रास होतो…सुनिल पुणेTM 8007939422 माणसाच्या आयुष्यात किती तरी चेहरे येतात, जातात. हजारो लोकांशी भेट होते, काही क्षणांसाठी संवाद होतो, काहींना पुन्हा आठवतही नाही. पण कधी कधी मात्र एखादा साधासुधा, अनोळखी वाटणारा चेहरा मनाला भिडतो. काही कारण नसताना तो चेहरा मनाच्या कॅनव्हासवर कायमचा उमटून जातो. खरं तर त्याचं आयुष्यात असणं वा नसणं याने आपल्या दिनचर्येला फारसा फरक पडत नाही, पण मनाच्या गाभाऱ्यात एक अदृश्य नातं जुळतं. जीव लावलेला असतो म्हणून तर त्रास होतो. एखाद्या हास्याने हृदयात हलकेच ठसे उमटतात, एखाद्या नजरेत आपुलकीचा उजेड दिसतो, आणि मन नकळत त्याला खास मानायला लागते. जीव लावण्यामागे तर्क नसतो, कारण नसतं… ती एक हृदयाची सहज प्रतिक्रिया असते. आणि मग हाच जीव लावलेला आपल्याला सुखही देतो, पण त्रासही देतो. कारण जितकी माणसं आपल्याला महत्त्वाची वाटतात, तितकीच त्यांच्या गैरहजेरीची, त्यांच्या दुराव्याची टोचणी जास्त लागते. एक अनोळखी चेहरा उगीच खास का होतो? कदाचित आपण नकळत त्या चेहऱ्यात आपल्या भावनांचा, आपल्या कमतरतेचा, आपल्या अपूर्णतेचा आधार शोधत असतो. म्हणून त्याचं महत्त्व ...

डिजिटल युगातील रिकामे व भरलेले खिसे!

*प्रथम माननिय पुल यांची माफी मागून हा लेख लिहितोय* डिजिटल युगातील रिकामे भरलेले खिसे! ... सुनिल पुणे TM 8007939422 भरलेला खिसा माणसाला "जग" दाखवतो… आणि रिकामा खिसा जगातील "माणसं" दाखवतो, हे तर सगळ्यांनी अनुभवलंय...(पुल) पण आता डिजिटल युग आलंय… इथे खिसा रिकामा असला तरी "फोन" मध्ये GPay, PhonePe, Paytm, UPI QR असला की आपण राजा! कोणी चहा विक्रेता असो किंवा मॉलमध्ये बिलिंग काऊंटर, "भाई, QR स्कॅन करा" म्हणालं की आपलं वर्चस्व टिकून राहतं. पूर्वी ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येत नसे, त्याला विकत घेणं जड जायचं. आता मात्र, धान्य काय  Amazon, Flipkart वर "Add to Cart" करणंही धाडसाचं झालंय. कारण उचलायला पोतं नाही, पण "Pay Now" दाबताना हृदयाचं ठोके मात्र दुप्पट होतात! "विचित्र आहे पण सत्य आहे…" आज ज्याला हवं ते मिळतं, ते Digital Wallet मध्ये मिळतं. UPI Transaction Free असलं तरी, खरी गंमत म्हणजे  Balance Always Zero…! जगाला गंमत आणि देवाला किंमत  दोन्हीच Swipe Machine मध्ये अडकून पडलंय. आता चांगले मित्र आणि औषधं दोन्ही जी...

वयाच्या प्रवासात बदलणारे प्रेमाचे टप्पे...

वयाच्या प्रवासात बदलणारे प्रेमाचे टप्पे...सुनिल पुणेTM 9359850065 माणसाचं वय जसजसं पुढे सरकतं, तसं प्रेमाचं रूपही बदलतं. तरुणपणी आपण डोळ्यांच्या चमकात, चेहऱ्याच्या तेजात, शरीराच्या आकर्षणात प्रेम शोधत असतो. पण आयुष्याचे ऋतू बदलले की हे आकर्षण मागे राहतं, आणि मनाची इच्छा वेगळीच होत जाते, आपल्याला हवं असतं कोणीतरी आपल्या शेजारी, पाठीमागे शांतपणे उभं राहावं, आपल्या थकलेल्या मनाला आधार द्यावा, आणि आपल्या अस्तित्वाला समजून घ्यावं. तरुणाईचं प्रेम म्हणजे एखाद्या वाऱ्याच्या झुळकीसारखं  ताजं, रंगीबेरंगी, हलकंफुलकं. पण वर्षे सरली की तेच प्रेम एका जुना वटवृक्षासारखं होतं  जाते, जिथं सावली मिळते, जिथं सुरक्षितता मिळते, आणि जिथं भूतकाळाच्या गोड आठवणी आणि भविष्याच्या चिंता दोन्हीही  संपतात आणि या टप्प्यावर प्रेमाचं सौंदर्य हे चेहऱ्याच्या गुळगुळीतपणात नसून, डोळ्यांत दिसणाऱ्या विश्वासात असतं. हसरा चेहरा सुरकुतला तरी, प्रियकराच्या दृष्टीत तोच पहिल्यासारखा सुंदर वाटत असतो. वय वाढलं की नात्याचं मोजमाप सुरू होते "तू माझ्यासाठी काय आणतोस" यात नसून "तू माझ्यासोबत आहेस का" यात होतं. हे प्...

ॲल्लोपॅथी विरुद्ध आयुर्वेद मग खरे कोण? सुनिल पुणे TM 8007939422

ॲल्लोपॅथी विरुद्ध आयुर्वेद मग खरे कोण? सुनिल पुणे TM 8007939422 आजच्या काळात एक गंभीर प्रश्न आपल्या समोर उभा राहतो आहे की,  “ॲल्लोपॅथी आणि आयुर्वेद यापैकी खरे कोण?” आपण ज्या भारतभूमीत जन्मलो, तिथे हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी आयुर्वेद ही महान वैद्यकीय परंपरा दिली. आयुर्वेदात रोग मुळाशी जाऊन त्यावर उपाय करण्याची ताकद आहे. आहार, विहार, पंचकर्म, औषधी वनस्पती या सर्वांचा समन्वय करून शरीर-मन-आत्मा या तिन्हींचा समतोल साधण्यावर भर आहे. परंतु आज आपण पाहतो की जगभरात आणि विशेषतः भारतात फक्त ॲल्लोपॅथी हॉस्पिटल्स, औषधनिर्मिती कंपन्या, मेडिकल्स आणि सर्जरी सेंटर्स प्रचंड वेगाने वाढले आहेत. कारण सोपे आहे,  ॲल्लोपॅथी ही ‘रुग्णसेवेपेक्षा इंडस्ट्री’ म्हणून उभी राहिली आहे. काही माझे निरीक्षणे व प्रश्न का ? प्रत्येक शहरात नवनवीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स उभे राहतात? का ? एखाद्या साध्या आजारासाठीही महागडी तपासणी (MRI, CT Scan, Sonography) आवश्यक केली जाते? का ? औषधे घेतली तरी रोग मुळापासून नाहीसा होत नाही? का ? दरवर्षी नवीन-नवीन रोग जन्म घेत आहेत ? का लोक सर्जरीपर्यंत पोहोचतात, पण त्या आधीचे सोप...