बायको आणि प्रेयसी
फरक बायको आणि प्रेयसी मधला ❤️🌻 सुनिल पुणेTM 9359850065
पुरुषाच्या आयुष्यात दोन स्त्रिया अनेकदा वेगवेगळ्या रूपात येतात
एक त्याचं आयुष्य सांभाळणारी बायको
आणि दुसरी त्याचं मन समजून घेणारी प्रेयसी
बायको संसाराचा पाया असते
पण प्रेयसी मनाच्या कोपऱ्यात कायम धडकणारा तो गोड श्वास असते
बायको घरात हक्काने वावरते
पण प्रेयसी हृदयात नकळत घर करून बसते
शोधून सापडते ती बायको
पण नकळत जीव गुंतवते ती प्रेयसी
बायकोसाठी विवाह मंडळ पुरेसं असतं
पण प्रेयसीसाठी पूर्ण विश्व पालथं घालावं लागतं
कारण प्रेम हे ठरवून होत नाही
ते अचानक होतं
एका आवाजावर
एका काळजीवर
एका “जेवलास का?” वर
एका “स्वतःची काळजी घे” वर
पुरुष जेव्हा पूर्ण जगासाठी मजबूत उभा असतो ना
तेव्हा त्याच्या थकलेल्या मनाला समजून घेणारी जी व्यक्ती असते,
ती बहुतेक वेळा प्रेयसीच असते
तिला तुमचं घर नको असतं
तुमची प्रॉपर्टी नको असते
तुमच्या खिशात किती पैसे आहेत याचं तिला काही देणंघेणं नसतं
तिला फक्त तुमचा वेळ हवा असतो
तुमचा आवाज
तुमचं हसणं
आणि “मी आहे तुझ्यासोबत” हे चार शब्द
बायको दिवस-रात्र सोबत राहूनही कधी कधी अपूर्ण राहते
पण प्रेयसी काही क्षणांच्या भेटीतही पूर्ण आयुष्य जगून घेते
कारण तिला माहित असतं
ती तुमच्या नावाची नसली,
तरी तुमच्या मनाची आहे
पुरुषाच्या आयुष्यात अशी एक स्त्री नक्की असते
जिच्यासमोर तो स्वतःला लपवत नाही
ना अहंकार
ना दिखावा
ना खोटं हसू
फक्त मन मोकळं करत राहतो
राधा आणि कृष्णाचं प्रेम आजही अमर आहे
कारण त्या प्रेमात मालकी नव्हती
फक्त समर्पण होतं
एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं
प्रेयसी ही फक्त शरीराची ओढ नसते
ती आत्म्याची सवय असते
जी दूर राहूनही सोबत असते
कधी कधी पुरुष संसार बायकोसोबत करतो
पण जगणं मात्र प्रेयसीच्या आठवणीत जगत असतो
आणि म्हणूनच
प्रत्येक पुरुषाच्या मनात कुठेतरी एक रुक्मिणी असते
जी आयुष्य सांभाळते
आणि एक राधा असते
जी मन सांभाळते ❤️🥀
लेखक: सुनिल पुणेTM 9359850065
Comments
Post a Comment