जिथे मान नाही, तिथे थांबणं आम्हाला मान्य नाही…लेखक सुनिल पुणेTM

जिथे मान नाही, तिथे थांबणं आम्हाला मान्य नाही…लेखक सुनिल पुणेTM

आम्ही सरळमार्गी आहोत. वाकड्या वाटांनी चालणं, खोट्या हसण्यामागे लपलेला स्वार्थ ओळखूनही गप्प बसणं, किंवा स्वतःच्या आत्मसन्मानाची किंमत मोजून कोणाच्या पायाशी झुकणं हे आम्हाला कधीच जमणार नाही. मान झुकवायचा असेल तर तो फक्त सत्यापुढे, मूल्यांपुढे आणि आपल्या अंतरात्म्यापुढेच.

आधी लोक म्हणायचे, “सगळ्यांशी जुळवून घेायला हवं.” पण जुळवून घेण्याच्या नावाखाली स्वतःची किंमत गमवायची असते, हे अनुभवातून उमगतं. जिथे आदर नाही, तिथे प्रेमही खोटं असतं. जिथे सन्मान नाही, तिथे नातं फक्त नावापुरतं उरतं. आणि जिथे आपल्याला कमी लेखलं जातं, तिथे मैत्रीही हळूहळू विषारी बनते.

म्हणूनच आम्ही ठरवलंय 
प्रेम असो, नातेसंबंध असोत किंवा मैत्री…
जिथे इज्जत मिळेल, तिथेच आम्ही थांबणार.
जिथे अपमानाच्या छोट्या-छोट्या टोचण्या “विनोद” म्हणून दिल्या जातात,
जिथे आपली उपस्थिती गृहीत धरली जाते,
जिथे आपली भावना दुर्लक्षित केली जाते 
अशा ठिकाणी आम्ही एक क्षणही राहणार नाही.

आमचं झुकणं हे आमची कमजोरी नाही, तर आमची निवड असते. पण आम्ही कुणापुढे झुकतो, हे आम्हीच ठरवतो. कारण आत्मसन्मानाची किंमत कळलेला माणूस कोणाच्या छायेखाली जगत नाही, तो स्वतःचा सूर्य बनून जगतो.

कधी कधी लोक म्हणतात, “तू बदललास.”
हो, बदललोय…
आधी सगळ्यांना समजून घेणारा होतो,
आता स्वतःलाही समजू लागलोय.
आधी सगळ्यांसाठी थांबायचो,
आता जिथे मान मिळेल तिथेच थांबतो.

आम्हाला गर्दीत उभं राहण्याची हाव नाही,
आम्हाला फक्त अशा माणसांच्या संगतीत राहायचं आहे
जिथे शब्दांना किंमत असते,
भावनांना वजन असतं
आणि माणसाला माणूस म्हणून पाहिलं जातं.

कारण शेवटी एकच सत्य आहे
प्रेम, नातं आणि मैत्री याचा खरा पाया “इज्जत” असते.
इज्जत नसेल, तर तिथे सगळंच खोटं.
आणि म्हणूनच आम्ही ठाम आहोत…
जिथे मान नाही, तिथे थांबणं आम्हाला मान्य नाही.
सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"