ऐकणं ही देखील एक मोठी माणुसकी आहे…सुनिल

ऐकणं ही देखील एक मोठी माणुसकी आहे…सुनिल पुणेTM 9359850065.


या जगात बोलणारे खूप आहेत, पण मनापासून ऐकणारे फार थोडे.

माझा स्वभाव तसाच आहे 
मी लोकांचं ऐकून घेतो…
न्याय करायला नाही,
उपदेश द्यायला नाही,
फक्त माणूस म्हणून माणसाला समजून घ्यायला.
कारण मला माहीत आहे,
समोरचा माणूस जेव्हा आपली व्यथा सांगतो,
तेव्हा तो फक्त शब्द मांडत नसतो तो आपल्या मनात साठवलेलं ओझं
थोडंसं हलकं करण्याचा प्रयत्न करत असतो.

आपल्यासाठी ते पाच-दहा मिनिटांचं संभाषण असतं,
पण त्याच्यासाठी ती
दिवसरात्र जळणारी वेदना असते…जी तो एकटाच सहन करत असतो. आजच्या धावपळीच्या जगात
कोणाकडे कोणासाठी वेळ नाही. “माझं काय?”, “मला काय?”
या प्रश्नांनी माणूस इतका व्यापलेला आहे
की समोरचा माणूस तुटत चाललाय हेही त्याला जाणवत नाही. अशा वेळी
कोणी तरी शांतपणे ऐकून घेणारा भेटणं ही त्या व्यक्तीसाठी औषधासारखी गोष्ट ठरते.

खरं सांगायचं तर,
प्रत्येक समस्येला उत्तर असतंच असं नाही.
प्रत्येक जखमेवर मलम लावता येतंच असं नाही.
पण समजून घेणारं एक कान
आणि आधार देणारी दोन शब्दं माणसाला पुन्हा उभं करू शकतात. म्हणूनच मी ठरवलं कोणी आपली व्यथा सांगायला आला,
तर त्याच्याशी सौजन्याने वागायचं.
तो रडत असेल तर थांबवायचं नाही,
तो शांत असेल तर प्रश्नांचा भडिमार करायचा नाही. कारण वेदना व्यक्त करण्याची
प्रत्येकाची पद्धत वेगळी असते.

कधी कधी
माणूस सल्ला शोधत नसतो,
तो फक्त “कोणी तरी माझं ऐकून घ्यावं”
इतकीच अपेक्षा ठेवून आलेला असतो. आणि अशा वेळी
आपण जर थोडं शांत राहिलो,
थोडं समजून घेतलं,
तर नकळत आपण
एखाद्याच्या आयुष्यात
मोठा आधार बनतो.

हे फार मोठं कर्तृत्व नाही,
यासाठी कुठलं पद, पैसा किंवा प्रतिष्ठा लागत नाही.
फक्त संवेदनशील मन आणि माणुसकीचा दृष्टिकोन
पुरेसा असतो.

आज जगाला
मोठ्या भाषणांची नाही,
मोठ्या शब्दांची नाही,
तर मनापासून ऐकून घेणाऱ्या माणसांची गरज जास्त आहे. आणि मला अभिमान आहे की, मी त्या मोजक्या लोकांपैकी एक आहे
जे ऐकून घेऊ शकतात…
कारण मला ठाऊक आहे 
कधी तरी मलाही
असाच कुणीतरी
शांतपणे ऐकून घेणारा माणूस हवा असेल...!

सुनिल पुणे TM 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"