ऐकणं ही देखील एक मोठी माणुसकी आहे…सुनिल
ऐकणं ही देखील एक मोठी माणुसकी आहे…सुनिल पुणेTM 9359850065. या जगात बोलणारे खूप आहेत, पण मनापासून ऐकणारे फार थोडे. माझा स्वभाव तसाच आहे मी लोकांचं ऐकून घेतो… न्याय करायला नाही, उपदेश द्यायला नाही, फक्त माणूस म्हणून माणसाला समजून घ्यायला. कारण मला माहीत आहे, समोरचा माणूस जेव्हा आपली व्यथा सांगतो, तेव्हा तो फक्त शब्द मांडत नसतो तो आपल्या मनात साठवलेलं ओझं थोडंसं हलकं करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्यासाठी ते पाच-दहा मिनिटांचं संभाषण असतं, पण त्याच्यासाठी ती दिवसरात्र जळणारी वेदना असते…जी तो एकटाच सहन करत असतो. आजच्या धावपळीच्या जगात कोणाकडे कोणासाठी वेळ नाही. “माझं काय?”, “मला काय?” या प्रश्नांनी माणूस इतका व्यापलेला आहे की समोरचा माणूस तुटत चाललाय हेही त्याला जाणवत नाही. अशा वेळी कोणी तरी शांतपणे ऐकून घेणारा भेटणं ही त्या व्यक्तीसाठी औषधासारखी गोष्ट ठरते. खरं सांगायचं तर, प्रत्येक समस्येला उत्तर असतंच असं नाही. प्रत्येक जखमेवर मलम लावता येतंच असं नाही. पण समजून घेणारं एक कान आणि आधार देणारी दोन शब्दं माणसाला पुन्हा उभं करू शकतात. म्हणूनच मी ठरवलं कोणी आपली व्यथा सांगायला आला, तर त्या...