“अस्तित्वाची जाणीव, जगणे आणि फक्त जिवंत राहणे यातला फरक” सुनिल पुणेTM
“अस्तित्वाची जाणीव, जगणे आणि फक्त जिवंत राहणे यातला फरक” सुनिल पुणेTM
आयुष्य हे प्रत्येकालाच मिळतं, पण त्याच जगणं फार थोड्यांना लोकाना जमतं.
“आयुष्यात स्वत:चं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय कुठेही आपल्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही” , हे वाक्य जीवनाचं सर्वात वास्तव चित्र रंगवतं.
जगात लाखो लोक आहेत, पण त्यातले काहीच आपली ओळख निर्माण करतात.
बाकीच्यांना समाज फक्त “आहेत” म्हणून ओळखतो, “झालेत” म्हणून नाही.
आजच्या स्पर्धेच्या युगात फक्त उपस्थित राहून चालत नाही.
स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, विचारांनी, कृतीने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी.
आपल्याकडून काही वेगळं घडलं, काही बदल निर्माण झाला, काहींना प्रेरणा मिळाली, तेव्हाच जग आपल्याकडे वळून पाहतं.
अन्यथा, आयुष्य लोकांच्या गर्दीत गुमनाम राहतं.
“आयुष्याचे सगळे निर्णय आयुष्यावर सोडून दिले तर, माणसाला फक्त जिवंत राहता येतं, जगता येत नाही.”
ही ओळ सत्य सांगते.
जो स्वतःच्या निर्णयाचं धाडस करत नाही, त्याचं जीवन दुसऱ्यांच्या हाती गेलं असतं.
जो स्वतःसाठी विचार करत नाही, त्याचं अस्तित्व परिस्थिती ठरवते.
आणि मग माणूस फक्त श्वास घेतो, पण जगत नाही.
जगणं म्हणजे जोखीम घेणं, चुकणं, शिकणं, आणि पुन्हा उभं राहणं.
ते म्हणजे स्वतःची किंमत स्वतः ठरवणं.
जगाला तुमचं नाव लक्षात ठेवायला भाग पाडणं.
तुमच्या उपस्थितीने काहीतरी बदल घडवणं, मग तो छोटा असो वा मोठा.
शेवटी, आयुष्य म्हणजे केवळ दिवस मोजणं नाही, तर प्रत्येक दिवस जगणं आहे.
स्वतःचं अस्तित्व जाणून घेणं, ते सिद्ध करणं, आणि त्यावर अभिमान बाळगणं हेच खरं जगणं आहे.
कारण जो स्वतःला सिद्ध करतो, त्यालाच जग ओळखतं.
बाकी सगळे फक्त उपस्थित राहतात, आणि काळाच्या ओघात विसरले जातात.
सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com.
[हा लेख नावासहीत पुढे पाठवुन शकतात.]
Comments
Post a Comment