सुख म्हणजे काय ?
सुख म्हणजे काय ?..सुनिल पुणेTM 8007939422
सुख ही वस्तू नसते, ती मिळवायची गोष्टही नसते…
सुख ही एक जाणिव आहे.
आपण कसे जगतो, कशाकडे पाहतो आणि कोणत्या गोष्टींना महत्त्व देतो, यावरूनच सुखाची व्याख्या ठरते.
आपण म्हणतो
“सुख म्हणजे काय? कालच्या दिवसाची खंत नसणे…”
खरंच! काल मागे गेला आहे.
तो परत येणार नाही.
त्यात केलेल्या चुका, गमावलेली माणसे, ओढवलेले प्रसंग…
या सगळ्यांवर बसून रडण्यात आयुष्य जातं.
पण कालच्या खंतित अडकून राहिलात तर आजचं सौंदर्य दिसत नाही.
म्हणूनच खरा शहाणा तोच, जो कालचं पान हळूच बंद करतो आणि आयुष्याच्या वहीत आजचं नवं पान उघडतो.
“आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे…”
आजचा दिवस आपल्याला देवाने (किंवा परमशक्तीने) दिलेला एक नवा मौका आहे.
कोणीही दुसरा आपल्या आयुष्याचा लेखक नसतो; आपल्या दिवसांची स्क्रिप्ट आपणच लिहायची असते.
दुसऱ्यांच्या अपेक्षांचे ओझे वाहण्यात आजचा दिवस वाया घालवला,
तर उद्या मागे वळून पाहताना फक्त रिकामेपणा दिसतो.
जगायचं असेल तर मनापासून जगावं
ज्या गोष्टी मनाला शांती देतात त्या कराव्यात,
ज्या माणसांनी हसू येतं त्यांच्यासोबत राहावं,
आणि ज्या स्वप्नांनी आपल्या डोळ्यांत चमक आणली आहे ती पूर्ण करायला पुढे जावं.
आणि शेवटची ओळ
“उद्याची चिंता न करणे.”
उद्या आला तर त्याचे उत्तरं घेऊनच येतो.
चिंता केली तरी काय होणार?
आणि नाही केली तरी काय जाणार?
उद्याची तयारी करून आजचा आनंद नाकारणं म्हणजे हातात असलेलं सुख दूर लोटणं होय.
उद्यासाठी धडपड करावी, पण भीती नको.
योजनांवर लक्ष द्यावं, पण मनावर दडपण नको.
कारण उद्या नेहमी आजपासूनच जन्म घेतो.
म्हणूनच खरे सुख म्हणजे
कालच्या ओझ्यातून मुक्त होणे,
आजला मनापासून जगणे,
आणि उद्याच्या भीतीत न अडकणे.
सुख दूर कुठे नसतं…
ते आपल्या हातात आहे
आपल्या विचारांत, आपल्या वृत्तीत,
आणि आपल्या आजच्या छोट्या छोट्या निर्णयांत.
आजचा दिवस तुमचाच आहे…
तो सुंदर करा, अर्थपूर्ण करा,
आणि त्यात आपला स्वतःचा प्रकाश भरा.
सुनिल पुणेTM 93598 50065, sunilpunetm.blogspot.com
Comments
Post a Comment