“समजून घेणारी जोडीदारीन” एक भावस्पर्शी लेख : सुनिल पुणेTM .

“समजून घेणारी जोडीदारीन”  एक भावस्पर्शी लेख : सुनिल पुणेTM .

पुरुषाला आयुष्यात खूप गोष्टी हव्या असतात  यश, प्रतिष्ठा, स्थैर्य... पण यापेक्षा जास्त त्याला हवी असते एक अशी स्त्री, जी त्याला ‘सावरून’ नव्हे तर ‘समजून’ घेईल.

जग त्याच्याकडून नेहमीच मजबूत राहण्याची, जबाबदार राहण्याची अपेक्षा करतं. पण या जबाबदारीच्या ओझ्याखाली त्याचं मनही कधी थकतं, तुटतं, थांबतं... त्या क्षणी त्याला गरज असते अशा स्त्रीची जी त्याच्या थकव्याला ओळखेल, त्याच्या शांततेतल्या किंकाळ्या ऐकेल. जी त्याच्या डोळ्यातून उमटणारे न बोलेले शब्द वाचू शकेल.

अशी स्त्री जी हळूच म्हणेल,
“सगळं ठीक आहे ना? काही झालं तरी मी आहे ना तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी…”
अशीच वाक्यं पुरुषाचं मन पुन्हा जिवंत करतात.

पुरुषाला अशी जोडीदार नको असते जी त्याला बदलायचा प्रयत्न करेल, तर अशी जी त्याला स्वीकारेल त्याच्या त्रुटींसकट, त्याच्या स्वभावासकट.
त्याला त्या स्त्रीचं स्मित हवं असतं, जे दिवसाच्या शेवटी त्याचं ‘घर’ बनतं.
आणि त्याला त्या स्त्रीचा विश्वास हवा असतो, कारण त्या विश्वासातच त्याचं पुरुषत्व नाही तर त्याचं माणूसपण फुलतं.

स्त्री असो वा पुरुष दोघांनाही एकमेकांच्या पंखांची गरज असतेच.
प्रेम म्हणजे एकाने दुसऱ्याला धरून ठेवणं नव्हे, तर एकमेकांना स्वच्छंदपणे उडू देणं आणि तरीही हातात हात घट्ट राहणं.

कारण खरं प्रेम तिथेच असतं जिथे बंधन नाही, पण जिव्हाळा असतो.
स्वातंत्र्य असतं, पण नात्याची ऊबही तितकीच असते.

ज्याच्या नशीबी अशी समजून घेणारी व्यक्ती येते, तोच खरा भाग्यवान!
मग तो पुरुष असो वा स्त्री, दोघांचं आयुष्य त्या नात्यात फुलतं.

लेखक : सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?