स्त्री आणि पुरुष यांची नाती टिकवण्याची खरी मानसिकता

*"स्त्री आणि पुरुष यांची नाती टिकवण्याची खरी मानसिकता".  लेखात वास्तव मांडतोय, सावध व्हा ! नाती जपाच !!.....सुनिल पुणेTM*

नातं तुटण्याच्या टप्प्यावर पोहोचलं की एक विलक्षण मानसिक खेळ सुरू होतो.
स्त्री बहुतेक वेळा बोलून, भांडून, आपली नाराजी बाहेर काढू लागते, कारण तिच्या मनात आधीच निर्णय घेतलेला असतो “हे नातं आता राहणार नाही.”
तर पुरुष अगदी विरुद्ध प्रतिक्रिया देतो तो शांत होतो, बोलणं कमी करतो, भांडण थांबवतो. त्याला कळतं की आता काहीही बोललं तरी नातं वाचणार नाही, त्यामुळे तो स्वतःचं मन सावरायला सुरुवात करतो.

ही भांडणाची सुरुवात आणि भांडणाचं थांबणं दोन्हीही एकाच सत्याची दोन वेगवेगळी चिन्हे आहेत.

स्त्री भांडते कारण तिच्या मनात अंत झालेला असतो

भांडण हे तिचं “प्रतिकाराचं शस्त्र” नसून “निर्णयाची घोषणा” असते.

ती वाद घालत नाही, तर ती मनातील दारं एक-एक करून बंद करत असते.

शब्द तिची तलवार असते, कारण भावनांचा अंत ती भावनिक संघर्षातून करते.

पुरुष शांत होतो कारण त्याच्या अंतर्मनात भूमिका संपलेली असते

तो भांडण थांबवतो म्हणजे त्याने हार मानली असं नाही, तर तो नात्याच्या शेवटाला स्वीकारायला लागलेला असतो.

पुरुष भांडत नाही म्हणजे त्याला काही फरक पडत नाही असं नसतं तो शांत राहून स्वतःचे तुकडे गोळा करायला सुरुवात करतो.

त्याच्या शांततेत एक तुटलेल्या माणसाची हळहळ असते, पण ती कुणालाच ऐकू येत नाही. हेच जगाचं वास्तव आहे की, भांडण सुरू करणारी स्त्री नातं तोडण्याच्या दिशेने पाऊल टाकते. भांडण थांबवणारा पुरुष नातं गमावण्याच्या तयारीला लागतो.

एकजण शब्दांमधून मुक्ती शोधतो, तर दुसरा शांततेतून वेदना सहन करतो.
आणि नातं संपवण्यापूर्वी स्त्री आवाज वाढवते, आणि पुरुष आवाज हरवतो.
एकजण बोलत राहतो, कारण ती आतून तुटलेली असते…
दुसरा बोलणं थांबवतो, कारण त्याने स्वतःला आतून वाचवायचं ठरवलेलं असतं.

हेच नात्याचं अंतिम सत्य आहे 
“भांडणाचा आवाज नातं वाचवण्याचा नसतो, तो नातं संपवण्याचा अलार्म असतो.”

सुनिल पुणेTM 9359850065, sunilpunetm.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

संवाद हरवले, संवेदना संपल्या – वाद आणि वेदनांचे राज्य!

वेडिंग फोटोग्राफी: व्यवसाय की केवळ भावनिक आवड?

"जीव लावायचं, पण लिमिटमध्ये"