ऐडियट बॉक्स vs स्मार्ट बॉक्स
*एप्रिलफुल तर सर्व समाज रोज होतोय*
*ऐडियट बॉक्स vs स्मार्ट बॉक्स*
लेखक: सुनिल पुणे TM 8007939422
पूर्वीच्या काळात टेलिव्हिजन म्हणजेच "ऐडियट बॉक्स" हा परिवाराच्या एकत्र येण्याचा एक महत्त्वाचा भाग होता. कुटुंबातील सगळी माणसं एकत्र बसून गप्पा मारत, कार्यक्रमांचा आनंद घेत आणि त्यातून मनोरंजनासोबतच काही शिक्षणही मिळवायची. कधी रामायण-महाभारत बघत आध्यात्मिक विचारांची देवाणघेवाण व्हायची, तर कधी चित्रपट, गाणी आणि कॉमेडी शोज बघून हास्याचा फवारा उडायचा.
घरातली मंडळी एकत्र बसून रात्री ९.३० पर्यंत मनोरंजनाचा आनंद घेत आणि नंतर शांत झोप घेत. कुटुंबीयांमध्ये संवाद होता, आपुलकी होती आणि एकमेकांप्रती जिव्हाळा होता. पण जसजसा काळ बदलला, तसे तंत्रज्ञान झपाट्याने पुढे गेले आणि "स्मार्ट फोन" नावाचा एक नवा प्रकार आला, ज्याने ऐडियट बॉक्सला मागे टाकलं आणि समाजालाच ऐडियट बनवलं.
आज प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्येच व्यस्त असतो. पूर्वी जेव्हा सगळे एकत्र बसायचे, आता ते स्वतःच्या खोलीत एकटे बसून स्क्रीनकडे एकटक बघतात. मोबाईलवर सोशल मीडियाच्या आहारी जाऊन खोट्या नात्यांमध्ये गुंततात, पण घरातील खऱ्या माणसांपासून तुटत जातात.
पूर्वीच्या काळात टीव्ही ऐडियट होता, पण कुटुंब स्मार्ट होतं. आज मात्र मोबाईल स्मार्ट झाला आणि कुटुंबीय ऐडियट झालेत. लोक वेड्यासारखे स्क्रीनवर डोळे लावून बसतात, पण आजूबाजूच्या माणसांची तोंडंही बघत नाहीत.
आपल्याला समाजाच्या या अवस्थेकडे वेळीच लक्ष द्यायला हवं. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करावा, पण त्याच्या आहारी जाऊ नये. कुटुंबासोबत वेळ घालवा, संवाद साधा, पुन्हा स्मार्ट बना. नाहीतर एक दिवस असा येईल की आपण एकटेच उरू आणि त्या "स्मार्ट बॉक्स" मध्ये बंदिस्त होऊन जाऊ.
वेळीच सावरा आणि परत स्मार्ट
सुनिल जाधव पुणेTM 8007939422, topsunil@gmail.com
Comments
Post a Comment