"शेवटचं ते बिलगणं…"
"शेवटचं ते बिलगणं…" – Sunil Pune TM
संध्याकाळी आकाशात एकटं फिरणारं ते पाखरू पाहिलं आणि मनात एक हुंकार उमटला…
किती सहज जातात ना काही लोक?
काहीच न सांगता… काहीच न मागता…
फक्त आठवणींच्या थेंबांत मन गुदमरून जातं…
ती गेली तेव्हा काही क्षणांसाठी नाही… ती माझं अख्खं आयुष्य घेऊन गेली.
तीचं हसणं, रुसणं, त्या डोळ्यांतली ओल… आणि शेवटचं ते बिलगणं –
माझं जग थांबलं होतं, पण ती पुढे गेली… कायमची.
आजही उशीवर तिचे केस सापडतात, आणि हृदय दरवाजा वाजल्यासारखं धडधडायला लागतं.
"कदाचित ती परत आली असेल…" असा निरर्थक विचार
मनाला सावरण्याआधीच डोळ्यांतून पाणी निघतं.
लोक म्हणतात, "जग पुढे चालतं."
हो… चालतं… पण कुठं? आणि कोणासाठी?
जगणं जेव्हा तिच्याशिवाय जगायचं असतं, तेव्हा ते 'जगणं' राहात नाही,
ते एक शिक्षा होते, जी रोज जगायची असते.
ती नसताना तिच्या आवडत्या गाण्यांनी हृदय छिन्न होतं,
ती आवडणारी कॉफी – आता नुसतं कटुतेच देते.
तिच्या आवाजाशिवाय सकाळही केविलवाणी वाटते.
तिच्या आठवणी, तिचे मेसेज, तिचं "आपण" म्हणणं…
आजही फोनमध्ये आहे…
डिलीट करावं वाटतं… पण मन म्हणतं, "ती परत येईल."
फसवणं… स्वतःची.
आजही मी ती बसायची जागा रिकामी ठेवतो.
जसं ती कोणालाही त्या जागी बसू देत नसे.
जणू ती जागा अजून तिचीच आहे…
आणि मी?
मी अजूनही तिचाच आहे.
Sunil Pune TM
एक नाव नाही…
एक श्वास आहे, जो आजही तिच्या नावाने चालतोय.
तिच्यासाठी…
जी कधीच परत येणार नाही.
(हा लेख शेअर करा… कदाचित कुणाचं हरवलेलं प्रेम त्याला पुन्हा भेटेल… किंवा निदान मन हलकं तरी होईल.)
सुनिल जाधव पुणे TM 8007939422 topsunil@gmail.com
Comments
Post a Comment