दुःखाचा डोंगर आणि हक्काचा खांदा
[ त्या मिठीत तिच्या कोवळ्या शरीराचे उभार त्याला जसे जाणवले तशी त्याच्याही शरीराने त्यावर एक रिएक्शन दिली ... आणि मग तिला आपल्या पोटाजवळ काहीतरी कडक जाणवलं ... त्याचं पौरुष ... तिच्या शरीराला स्पर्श करू पाहणारं ... अगदी चुकीच्या स्थळी आणि चुकीच्या वेळी! ]
दुःखाचा डोंगर आणि हक्काचा खांदा
चौदा वर्षांची माधुरी दहावीला जाणार होती आणि एके दिवशी तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
तिचे आई वडील काही कामासाठी कोकणात गावी गेले होते. पण तिची परीक्षा जवळ आल्यामुळे तिला सोबत नेलं नव्हतं. ते परत येत असताना घाटात त्यांच्या गाडीला अपघात झाला ... दोघेही ऑन द स्पॉट गेले ... माधुरीवर तर जणू आभाळच कोसळलं.
लाडात वाढलेली एकुलती एक मुलगी होती ती ... आई वडीलांशिवाय कधीच एकटी राहिलेली नव्हती .... त्यातून इतक्या लहान वयात त्यांना गमावणं म्हणजे काय असतं ... काही सुचत नव्हतं.
माधुरीच्या आई-वडिलांचे पार्थिव त्यांच्या वाड्याच्या आवारात ठेवलेलं होतं ... ते पाहून तिचे अश्रू काही केल्या थांबत नव्हते .... जवळपासचे सर्व नातेवाईक येऊन बघून जात होते. अगदी माधवचे ऑफिसमधील सहकारी, कोल्हापुरातल्या सगळ्या साखर कारखान्याचे पदाधिकारी, कर्मचारी, तिच्या आजोबांच्या राजकीय वर्तुळातील लोक ... सर्व येऊन त्यांना भेटून जात होते. त्या इवल्याश्या जीवाकडे पाहून हळहळ व्यक्त करण्याशिवाय ते काहीच करू शकत नव्हते.
नाही म्हणायला तिचा काका मिलिंद मात्र त्या दिवशी शुद्धीत होता ... नशीब नेहमीप्रमाणे प्यायलेला नव्हता ... किंवा तसा असला तरी हि बातमी ऐकून त्याची खाडकन उतरली असावी.
त्याने आपल्या पुतणीला सावरायचा प्रयत्न केला. पण काहीही फायदा झाला नाही ... तिच्या आयुष्यावर सर्वात मोठं संकट आलं होतं त्याला कोण काय करणार?
दुःखाचा पहिला आवेग ओसरला तसे माधुरीचे अश्रू सुकून गेले. तिला माहीत होतं की, हा काका किंवा आता भेटीला आलेले हे सगळे बाहेरचे लोक तिच्या वडिलांना ओळखत असले तरी तिच्यासाठी जवळचे नव्हते.
माधुरीसाठी आई-वडिलांशिवाय इतकं जवळचं कोणीच नव्हतं की ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती रडू शकेल ... आणि ते आईवडीलच जेव्हा या जगात उरले नाहीत ... तेव्हा तिला खांदा कुठून मिळणार?
अशावेळी वाड्याच्या आवारात एक आलिशान पोर्ष (Porche) कार येऊन थांबली. माधुरीच्या देविका काकीचा भाऊ सर्जेराव इनामदार हे आपल्या कुटुंबासहित त्यांना भेटायला आले होते.
खाली मान घालून बसलेल्या माधुरीला काहीतरी वेगळं जाणवलं आणि तिने मान वर केली. त्या पोर्ष मधून बाहेर पडणारा संग्राम तिच्या दृष्टीस पडला ... ती तशीच उठली आणि धावत जाऊन त्याला बिलगली ....
खरं तर नात्याने संग्राम माधुरीच्या काकीचा भाचा होता पण त्यापेक्षा जास्त तो तिचा बेस्ट फ्रेंड होता ... बालपणी अगदी जिवलग मैत्री होती त्यांची ... पण तीन वर्षांपूर्वी असं काही झालं कि ती त्याला त्यानंतर भेटलीच नव्हती. त्यातून तो दहावीत गेल्यापासून त्याच्या आईने त्याचे सगळे स्पोर्ट्स बंद केले आणि त्याला फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं.
त्याचबरोबर त्याचं आत्याच्या घरी येणं आणि माधुरीला भेटणं सुद्धा बंद झालं. फोन वर कधीतरी बोलणं व्हायचं तितकंच!
यंदा संग्राम बारावीला होता. त्याची आई सोबत येऊ नको ... तर अभ्यास कर म्हणून बजावत होती. पण जेव्हा आपल्या बेस्ट फ्रेंड वॉर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर तो तिच्यापासून कसा दूर राहणार होता. तो हट्टाने त्यांच्या सोबत आला.
त्यामुळे तीन वर्षांपूर्वी माधुरीला भेटलेला संग्राम आणि आत्ताचा संग्राम यांच्यात जमीन-आसमानाचा फरक होता.
वयात येऊ लागला तसा तो जबरदस्त हँडसम दिसायला लागला होता. स्पोर्ट्स बंद झाले तरी घरी व्यायाम, सायकलिंग आणि स्विमिंग सुरूच होतं. त्यामुळे आधीपेक्षा त्याची उंची आता ताडमाड वाढली होती.
त्यामानाने माधुरी आताशी कुठे वयात येत असली तरी तिची उंची तितकीशी वाढली नव्हती ... आधी संग्रामच्या कानांपर्यंत येणारी माधुरी आता खांद्यापर्यंत सुद्धा पोहोचत नव्हती.
तरी तिने टाचा उंच करून त्याच्या गळ्यात हात टाकले ... मघापासून सुकलेल्या अश्रूंचा बांध पुन्हा एकदा सुरू झाला. तिच्या अश्रूंनी त्याचा टी-शर्ट भिजत होता पण त्याला त्याची फिकीर नव्हती. त्यानेही अलगद आपले हात तिच्या पाठीवर ठेवले आणि हळुवार थोपटत तो तिला शांत करायचा प्रयत्न करू लागला.
दोघांच्याही नकळत हळूहळू मिठी घट्ट होऊ लागली. तो सुद्धा तिला जवळजवळ तीन वर्षांनी बघत होता. आधी बॉबकट मध्ये असलेल्या छोट्याशा माधुरीचे केस लांब झाले होते. आता ती छोटीशी मुलगी राहिली नव्हती तर पौगंडाच्या उंबरठ्यावरचे शारीरिक बदल आपलं अस्तित्व दाखवायला लागले होते. अंगकाठी पहिल्यासारखीच बारीक असली तरी छातीचे उभार मात्र जाणवण्या इतके वाढले होते.
त्या घट्ट मिठीत तिच्या उभारांचा त्याला स्पर्श झाला आणि त्याच्या अलीकडेच वयात आलेल्या त्याच्या शरीराने रिऍक्ट व्हायला सुरुवात केली.
माधुरी त्याची बेस्ट फ्रेंड होती त्यामुळे आधी कधी त्याला माधुरी बद्दल असं काही वाटलं नव्हतं ... पण आताच हे असं का होतंय ... त्याला काही कळेना!
हे जे काही होत आहे ते अगदी चुकीच्या वेळी होतंय ते त्याला जाणवलं. त्याने तिच्या पाठीवरचे हात काढले ... मिठी सोडून दिली ... तिला हलकेच आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला.
पण ती तर दूर व्हायला अजिबात तयार नव्हती .... आई वडिलांना गमावल्यानंतर पहिल्यांदाच कोणीतरी आपलं माणूस भेटलं होतं ... ज्याच्या खांद्यावर हक्काने डोकं ठेवून ती रडू शकत होती.
संग्राम ने मिठी सोडवण्याचा प्रयत्न केला तशी माधुरीची मिठी अजूनच घट्ट होऊ लागली. त्यानेही पुन्हा तिच्या पाठीवर हात टेकले ... आणि त्याच्याही नकळत ते तिच्या शरीरावर पुन्हा एकदा घट्ट झाले ...
शेवटी जे व्हायला नको तेच झालं ...
तिच्या शरीराचे उभार जसे त्याला जाणवायला लागले तशी त्याच्याही शरीराने त्यावर एक रिएक्शन दिली.
आणि मग तिला आपल्या पोटाजवळ काहीतरी कडक जाणवलं ...
.
.
.
त्याचं पौरुष ... तिच्या शरीराला स्पर्श करू पाहणारं ... अगदी चुकीच्या स्थळी आणि चुकीच्या वेळी!
काहीतरी चुकीचं घडतंय हे दोघांनाही कळत होतं ... पण वळत नव्हतं कारण तितकी दोघांचीही मनं परीपक्व नव्हती.
तिने झटक्याने दूर होण्याचा प्रयत्न केला पण एव्हाना संग्रामची मिठी अजूनच घट्ट झाली होती.
माधुरीच्या वडिलांनी तिला कराटे ट्रेनिंग आणि सेल्फ डिफेन्सचे धडे सुद्धा दिलेले होते. त्याचाच वापर करून तिने आपली दोन्ही हात छातीजवळ आणले आणि ताडकन एका झटक्यात संग्रामची ती नकोशी वाटणारी मिठी सोडवली.
तो भानावर आला ... आता काय घडलं ते त्याला जाणवलं ... त्याला तिला सॉरी बोलायचं होतं पण ओठातून शब्द फुटत नव्हते.
त्याने नजर खाली घातली आणि त्या गिल्टी नजरेनेच तिला 'सॉरी' बोलण्याचा प्रयत्न केला.
फक्त नजरेची भाषा त्यांच्यासाठी नवीन नव्हती. त्यात दोघेही एक्स्पर्ट होते ... बालपणी कित्येक वेळा डोळ्यांनीच ओळखायचे गेम्स खेळले होते .... कित्येक प्लॅन ठरवले होते .... दोघांचीही इतरांपासून लपवलेली सिक्रेट्स ते नजरेच्या भाषेने एकमेकांना सांगायचे ... अगदी सगळ्यांच्या समोर ...आणि कोणाला काही कळायचंच नाही.
पण सध्या तरी माधुरी ती भाषा समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती.
स टा क !!!
तिने खाडकन त्याला कानाखाली मारली आणि गर्रकन वळून धावत वरती आपल्या खोलीत निघून गेली.
ज्या क्षणी तिला तो स्पर्श जाणवला त्याच क्षणी तिला कळलं होतं कि आपला हक्काचा खांदा आता आपला राहिला नाही ...
संग्राम साठी सुद्धा हे सहन करणं कठीण होतं ... ताड ताड ढांगा टाकत तो आपल्या पोर्ष कडे गेला. ड्रायविंग सिटचा दरवाजा खोलून आत बसलाच होता कि समोरचा दरवाजा उघडून त्याचे वडील आत आले .
ड्रायविंग सिटच्या बाजूने गेला म्हणजे हा गाडी नक्कीच कुठेतरी नेऊन ठोकणार आणि आपला राग महागड्या गाडीवर काढणार ... सर्जेरावांना आपल्या लेकाच्या रागीट स्वभावाची कल्पना होती ... आणि रागाला आला कि हा काहीही करू शकतो ते पण माहित होतं.
फक्त माधुरीच्या बाबतीत तो थोडा हळवा होता. पण आज असं काय झालं असेल कि तिने त्याला आधी मिठी मारली आणि मग सर्वांसमोर खाडकन कानाखाली .... तो इतक्या उशिरा भेटायला आला म्हणून तिला राग आला असेल का ?
आपली श्रीमंती , स्टेट्स , पोसिशन आणि त्यावर भरीस भर म्हणून संग्रामचं टीनएज वय ... एवढा मोठा अपमान सहन करणं शक्यच नाही असं त्यांना वाटत होतं. रागाच्या भरात तो काहीही करून बसेल .... त्यात माधुरीचीही मनस्थिती ठीक नाही म्हणूनच तिने असं केलं तर आपणच आपल्या लेकाला समजवायला हवं अशा विचाराने ते संग्रामच्या मागे धावत येऊन गाडीत बसले.
तिकडे माधुरीच्या मागे तिचा काका मिलिंद गेला होता.
दोघांनीही आपापल्या पाल्यांना खोदून विचारायचा प्रयत्न केला पण ते दोघेही काहीच बोलायला तयार नव्हते.
आपल्या सोबत जे घडलं ते माधुरी .... तिच्या काकाला ... एक पुरुषाला कशी बरं सांगणार होती ?
जर देविका काकी आली असती तर कदाचित काही वेगळं घडलं असतं. पण तिच्या काकीला तिची अजिबात काळजी नव्हती हे तिला आणि सर्वांना चांगलंच माहित होतं.
आपल्या कडून केवढी मोठी चूक झाली ते आपल्या वडिलांना सांगायला संग्रामला शरम वाटत होती. त्यामुळे तो काहीच बोलला नाही. त्याचा राग माधुरी वर नव्हता तर स्वतःवर होता ... हे तो आपल्या वडिलांना कसं सांगणार होता.
तिथे काय घडलं हे कधीही माधुरी किंवा संग्राम दोघांच्याही ओठांवर आलं नाही .
तिथे असलेल्या जवळजवळ प्रत्येकानेच तो प्रसंग पाहिला पण आधी संग्रामच्या गळ्यात पडून रडणारी माधुरी अचानक त्याच्या खाडकन कानाखाली का मारते हे कोणालाच कधीच कळलं नाही.
पण देविकाला मात्र थोडासा अंदाज आला होता. तिची कळतंय पण वळत नाही अशी स्थिती झाली होती.
जेव्हा तिने माधुरीला संग्रामला मिठी मारताना बघितलं त्याचवेळी तिच्या डोक्यात एक वेगळा प्लॅन आकाराला येऊ लागला होता. पण त्यावर अंमल कसं करायचं याचा विचार करण्यापूर्वीच माधुरीने संग्रामच्या कानाखाली वाजवली आणि देविकाला आपल्या प्लॅनला आवर घालावा लागला.
पण कधी ना कधी या प्रकरणाच्या मुळाशी जायचं हे तिने नक्की केलं. त्यासाठी कदाचित तिला थोडे दिवस का होईना पण माधुरीला आपलं म्हणावं लागणार होतं तिच्याशी गोड बोलावं लागणार होतं.
पण जे काही झालं ते शोधून काढायचं आणि त्याचा आपल्या स्वार्थासाठी वापर कसा करता येईल हे पाहण्याचा तिने निर्धार केला.
माधुरीचा संग्राम वर राग आहे पण त्याचा मात्र माधुरीवर अजिबात राग नाही ... अगदी तो कितीही रागीट असला तरी!
पण तो कधी माफी मागण्याची हिंमत करेल का?
आणि माधुरी तरी ती माफी स्वीकारू शकेल का?
बालपणीच्या जिवलग मैत्रीमध्ये आता मिठाचा खडा पडला आहे तर ह्या नात्याचं भविष्य काय असेल?
या सगळ्या प्रकरणात कोणाची चुकी असेल असं तुम्हाला वाटतं?
संग्रामची, माधुरीची, देविकाची कि अजून कोणी? नियती...
✍🏻❤️😭
Comments
Post a Comment